मालट्रकमधून लांबविले १२ गॅस सिलेंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 20:52 IST2020-05-23T20:52:49+5:302020-05-23T20:52:55+5:30

जळगाव : एमआयडीसी परिसरातील भारत गॅस कंपनीच्या गोडावूनच्या भिंती जवळ उभ्या असलेल्या एमएच़०४़सीपी़५५६७ क्रमांकाच्या मालट्रकमधून १६ हजार ८०० रूपये ...

12 gas cylinders removed from the truck | मालट्रकमधून लांबविले १२ गॅस सिलेंडर

मालट्रकमधून लांबविले १२ गॅस सिलेंडर

जळगाव : एमआयडीसी परिसरातील भारत गॅस कंपनीच्या गोडावूनच्या भिंती जवळ उभ्या असलेल्या एमएच़०४़सीपी़५५६७ क्रमांकाच्या मालट्रकमधून १६ हजार ८०० रूपये किंमतीचे १२ रिकामे गॅस सिलेंडर अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे़ याप्रकरणी ट्रक चालक निवृत्ती महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

निवृत्ती पांडूरंग महाजन हे अयोध्यानगरात कुटूंबीयांसह राहतात़ ते राजेश देविदास बोरसे यांच्या मालकीच्या ट्रकवर भारत गॅस येथे कामाला आहेत़ दरम्यान, महाजन गुरूवार, २१ रोजी भारत गॅस एजन्सीचे गॅस सिलेंडर एमएच़०४़सीपी़५५६७ क्रमांकाच्या मालट्रकमध्ये भरून औरंगाबार येथील नरसिंह एजन्सी येथून जळगावसाठी रवाना झाले़ सायंकाळी ५ वाजता ते जळगावात पोहोचले़ नंतर त्यांनी मालट्रक हा एमआयडीसी परिसरातील भारत गॅसच्या गेट बाहेर उभा उभा करून ते आराम करण्यासाठी घरी निघून गेले़

३०६ पैकी १२ गॅस सिलेंडर चोरी
शुक्रवार, २२ रोजी सकाळी ८ वाजता निवृत्ती महाजन हे ड्युटी आले असता, त्यांना ट्रकमधील ३०६ गॅस सिलेंडर पैकी १२ गॅस सिलेंडर कमी दिसून आले़ त्यांनी आजू-बाजूला शोध घेतला़ अखेर त्या चोरी झाल्याची खात्री झाली़ त्यांनी अखेर शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पूढील तपास विजय पाटील करीत आहेत़

 

 

Web Title: 12 gas cylinders removed from the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.