शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आविष्कार स्पर्धेच्या स्थळ निश्चितीसाठी ११ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 2:55 PM

जळगाव : विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून आविष्कार स्पर्धेचे आयोजन केले जाते ...

जळगाव : विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून आविष्कार स्पर्धेचे आयोजन केले जाते असते़ यंदाच्या जिल्हास्तरीय स्पर्धेच्या स्थळ निश्चितीसाठी महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते़ मुदतीअंती जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून ११ महाविद्यालयांचे प्रस्ताव विद्यापीठाला प्राप्त झाले आहे़दरम्यान, विद्यापीठाकडून यंदाच्या स्पर्धेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून जिल्हास्तरीय स्पर्धा ही ३० डिसेंबर रोजी तर विद्यापीठस्तरीय स्पर्धा ७ व ८ जानेवारी रोजी होणार आहे़दरवर्षी जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा अविष्कार स्पर्धेत सहभाग असतो़ स्पर्धेमध्ये कलाविष्कार सादर करून अनेक विद्यार्थ्यांनी पारितोषिक तर पटकावली, सोबतच आपले संशोधन जगासमोर मांडणाऱ्याची संधी मिळाली़ तर विद्यापीठाकडून नुकत्याच जिल्हास्तरीय व विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत़ जिल्हास्तरीय स्पर्धा ही जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह विद्यापीठ परिसर अशा चार ठिकाणी होईल़ या स्पर्धेतून विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांची विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे़ विद्यापीठस्तरीय स्पर्धा ही ७ व ८ जानेवारी असे दोन दिवसीय असेल़स्थळ निश्चित होताच विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांसाठी रजिस्टेशन अर्थात आॅनलाइन नोंदणीसाठी मुदत देण्यात येणार आहे़महाविद्यालयांकडून मागविले होते प्रस्तावआविष्कार स्पर्धेच्या तारखा जरी जाहीर झाल्या असल्यातरी अद्याप स्पर्धा कुठे होणार हे निश्चिती झालेले नाही़ म्हणून जळगाव, धुळे, नंदुबार येथे स्पर्धा कुठल्या महाविद्यालयाच्या ठिकाणी व्हाव्यात, यासाठी विद्यापीठांकडून महाविद्यालयांना पत्र पाठवून ६ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले होते़ मुदतीच्याअंती ११ महाविद्यालयांनी स्पर्धेसाठी पुढाकार घेतला आहे़ त्यात जळगाव जिल्ह्यातून ४ तर धुळे जिल्ह्यातून ६ आणि नंदुरबार जिल्ह्यातून १ असे एकूण ११ प्रस्ताव विद्यापीठाला प्राप्त झालेले आहे़ प्राप्त प्रस्तावानुसार विद्यापीठातील समिती स्थळ निश्चित करतील़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव