आविष्कार स्पर्धेच्या स्थळ निश्चितीसाठी ११ प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 14:56 IST2019-11-07T14:55:37+5:302019-11-07T14:56:11+5:30
जळगाव : विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून आविष्कार स्पर्धेचे आयोजन केले जाते ...

आविष्कार स्पर्धेच्या स्थळ निश्चितीसाठी ११ प्रस्ताव
जळगाव : विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून आविष्कार स्पर्धेचे आयोजन केले जाते असते़ यंदाच्या जिल्हास्तरीय स्पर्धेच्या स्थळ निश्चितीसाठी महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते़ मुदतीअंती जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून ११ महाविद्यालयांचे प्रस्ताव विद्यापीठाला प्राप्त झाले आहे़
दरम्यान, विद्यापीठाकडून यंदाच्या स्पर्धेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून जिल्हास्तरीय स्पर्धा ही ३० डिसेंबर रोजी तर विद्यापीठस्तरीय स्पर्धा ७ व ८ जानेवारी रोजी होणार आहे़
दरवर्षी जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा अविष्कार स्पर्धेत सहभाग असतो़ स्पर्धेमध्ये कलाविष्कार सादर करून अनेक विद्यार्थ्यांनी पारितोषिक तर पटकावली, सोबतच आपले संशोधन जगासमोर मांडणाऱ्याची संधी मिळाली़ तर विद्यापीठाकडून नुकत्याच जिल्हास्तरीय व विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत़ जिल्हास्तरीय स्पर्धा ही जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह विद्यापीठ परिसर अशा चार ठिकाणी होईल़ या स्पर्धेतून विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांची विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे़ विद्यापीठस्तरीय स्पर्धा ही ७ व ८ जानेवारी असे दोन दिवसीय असेल़
स्थळ निश्चित होताच विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांसाठी रजिस्टेशन अर्थात आॅनलाइन नोंदणीसाठी मुदत देण्यात येणार आहे़
महाविद्यालयांकडून मागविले होते प्रस्ताव
आविष्कार स्पर्धेच्या तारखा जरी जाहीर झाल्या असल्यातरी अद्याप स्पर्धा कुठे होणार हे निश्चिती झालेले नाही़ म्हणून जळगाव, धुळे, नंदुबार येथे स्पर्धा कुठल्या महाविद्यालयाच्या ठिकाणी व्हाव्यात, यासाठी विद्यापीठांकडून महाविद्यालयांना पत्र पाठवून ६ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले होते़ मुदतीच्याअंती ११ महाविद्यालयांनी स्पर्धेसाठी पुढाकार घेतला आहे़ त्यात जळगाव जिल्ह्यातून ४ तर धुळे जिल्ह्यातून ६ आणि नंदुरबार जिल्ह्यातून १ असे एकूण ११ प्रस्ताव विद्यापीठाला प्राप्त झालेले आहे़ प्राप्त प्रस्तावानुसार विद्यापीठातील समिती स्थळ निश्चित करतील़