जालन्यात बिबट्याच्या हल्ल्यात तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 16:05 IST2018-08-30T16:05:09+5:302018-08-30T16:05:45+5:30
शेतात मजूरीसाठी जात असलेल्या एका तरुणावर बिबट्याने हल्ला करुन जागीच ठार केले.

जालन्यात बिबट्याच्या हल्ल्यात तरुण ठार
घनसावंगी (जालना ) : शेतात मजूरीसाठी जात असलेल्या एका तरुणावर बिबट्याने हल्ला करुन जागीच ठार केल्याची घटना आज सकाळी घनसावंगी तालुक्यातील राजेगाव शिवारात घडली. अरुण रमेश आहिरे (२२) असे मृत तरुणाचे नाव आहे.
अरुण शेतात मजुरी करून आपला व परिवाराचा उदरनिर्वाह करतो. आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास तो राजेगाव शिवारातील शेतात काम करण्यासाठी जात होता. यावेळी अचानक बिबट्याने हल्ला करुन त्याला जागीच ठार केले.
घटनास्थळाचा वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे. मृत अरुणच्या अंगावरील नखाच्या ओरखड्यावरुन हा हल्ला बिबट्यानेच केल्याचा अंदाज वनविभागाच्या वर्तविला आहे. वन विभागाने परिसरात बिबट्याच्या शोध सुरु केला आहे.