परतूरमध्ये युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:52 IST2019-09-01T00:52:25+5:302019-09-01T00:52:53+5:30
शारजाह मैदानावर युवकाचा मृतदेह आढळून आला. मयताच्या डोक्याच्या पाठीमागे असलेल्या जखमेमुळे हा प्रकार खुनाचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला

परतूरमध्ये युवकाचा खून
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : शहराजवळील शारजाह मैदानावर एका १८ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. मयताच्या डोक्याच्या पाठीमागे असलेल्या जखमेमुळे हा प्रकार खुनाचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. ही घटना शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास समोर आली.
कुंदन घनश्याम खंडेलवाल (१८) असे मयत युवकाचे नाव आहे. परतूर शहरातील मोंढा भागात राहणारा कुंदन खंडेलवाल हा युवक शनिवारी सकाळी घरातून बाहेर गेला होता. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तहसीलच्या पाठीमागे असलेल्या शारजाह मैदानावर त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी मयताच्या डोक्याला पाठीमागून जखमा दिसून आल्या. त्यामुळे मयताचा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी मयताची दुचाकी आढळून आली. मयताचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, या घटनेनंबर बाजारपेठ बंद ठेवून मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी नातेवाईकांनी लावून धरली होती.