महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावले प्राण; एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने पालकांचा टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 14:47 IST2021-01-12T14:46:22+5:302021-01-12T14:47:18+5:30

Accident at Jalana यावेळी तरुणाने प्राण वाचविलेली महिला किरकोळ जखमी झाली आहे. 

The young man lost his life in an attempt to save the woman; The death of an only child is a tragedy for parents | महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावले प्राण; एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने पालकांचा टाहो

महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावले प्राण; एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने पालकांचा टाहो

भोकरदन : अचानक समोर आलेल्या महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीचालक कंटेनर खाली चिरडला गेल्याची घटना मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास भोकरदन-जालना रस्त्यावरील गिरणारे हॉस्पिटल समोर घडली. शेख कलीम शेख रईस (18,  पानगल्ली,उस्मानपेठ,भोकरदन ) असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. यावेळी तरुणाने प्राण वाचविलेली महिला किरकोळ जखमी झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील उस्मानपेठ भागातील रहिवाशी शेख कलीम हा तरुण गॅरेजवर मॅकेनिक म्हणून काम करतो. मंगळवारी सकाळी काही कामानिमित्त तो जालना रोडवरील गिरणारे हॉस्पिटल परिसरात आला होता. येथील काम आटोपून तो दुचाकीने परत निघाला. रस्त्यात अचानक त्याच्या समोर एक महिला आल्याने तिला वाचविण्यासाठी कलीमने गाडी थोडी बाजूला घेतली. याच दरम्यान, भोकरदनहुन जालन्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कंटेनरला (क्रमांक जिजे 26 टी 5961 ) त्याची धडक बसली. धडकेनंतर कलीम हा कंटेनरच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा चिरडून जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर जवळपास अर्धा तास मृतदेह जाग्यावर पडून होता. यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अपघाताचा पोलीसांनी  पंचनामा केला असून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला आहे. कलीमच्या मृत्यूच्या वार्तानंतर रुग्णालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. 

एकुलता एक मुलगा होता
अपघातात ठार झालेला कलीम हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तो एका गॅरेजवर मेकॅनिक म्हणून काम करीत होता, तर वडील दुसऱ्याच्या दुकानात केळी व पान विक्री करतात. 

Web Title: The young man lost his life in an attempt to save the woman; The death of an only child is a tragedy for parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.