‘तू खिडकी फोडली आता मी तुला फोडतो'; जालन्यात भावावर झाडली भावाने गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 17:38 IST2019-09-19T17:35:13+5:302019-09-19T17:38:22+5:30

थोडक्यात जीव वाचला

'You broke the window, now I will kill you'; firing on brother in Jalna | ‘तू खिडकी फोडली आता मी तुला फोडतो'; जालन्यात भावावर झाडली भावाने गोळी

‘तू खिडकी फोडली आता मी तुला फोडतो'; जालन्यात भावावर झाडली भावाने गोळी

ठळक मुद्देभावांमध्ये काही दिवसांपासून जागेचा वाद सुरु आहे

जालना : घराच्या खिडकीची काच फोडल्याचा जाब विचारणाऱ्या भावावर गावठी बंदुकीतून गोळी झाडणाऱ्या भावाविरुद्ध सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जालना शहरातील रामनगर भागातील बालाजी गल्लीत घडली.संतोष ताराचंद यादव (रा. जालना) असे आरोपीचे नाव आहे.

सतीश ताराचंद यादव  हे जालना शहरातील रामनगर भागात बालाजी गल्लीत राहतात. सतीश यांनी बांधलेल्या घरातील सहा खोल्यांवर त्यांचे भाऊ संतोष यांनी ताबा  आहे. यावरून या दोघांमध्ये मागील पाच महिन्यांपासून वाद सुरू आहे. बुधवारी सकाळी सतीश यांच्या घराच्या खिडकीच्या काचा संतोष यांनी फोडल्या. याचा जाब सतीश यांनी विचारताच संतोष यांनी ‘आता मी तुला फोडतो, बिल्डिंग माझी आहे. तुला आता मी दाखवतो’ अशी धमकी देत घरातील बंदूक आणली. त्यावेळी सतीश तेथून पळाले असता त्यांच्या पाठीमागे जाऊन संतोष यांनी त्यांच्यावर गोळी झाडली.  निशान चुकल्याने गोळी लागली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सतीश यादव यांच्या तक्रारीवरून संतोष यादव विरुद्ध सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांची भेट
काच फोडण्याच्या किरकोळ कारणावरून भावाने भावावर गोळी झाडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोनि. संजय देशमुख यांनी भेट दिली. अधिक तपास पोउपनि. रूपेकर  करीत आहेत.
 

Web Title: 'You broke the window, now I will kill you'; firing on brother in Jalna