लायन्स क्लबचे कार्य समाजाच्या हिताचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:30 IST2020-12-31T04:30:28+5:302020-12-31T04:30:28+5:30
आ. राठोड ; लायन्सच्या कार्यालयाला भेट परतूर : लायन्स क्लबच्या वतीने नेहमीच विविध उपक्रम राबविल्या जाते. हे उपक्रम समाजाच्या ...

लायन्स क्लबचे कार्य समाजाच्या हिताचे
आ. राठोड ; लायन्सच्या कार्यालयाला भेट
परतूर : लायन्स क्लबच्या वतीने नेहमीच विविध उपक्रम राबविल्या जाते. हे उपक्रम समाजाच्या हिताचे असून, इतर सामाजिक संस्थांनीही लायन्स क्बल कार्याची दखल घ्यावी, असे आवाहन आ. राजेश राठोड यांनी केली. आ. राठोड यांनी लायन्स क्लबच्या कार्यालयाला बुधवारी भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना आ. राठोड म्हणाले की, लायन्स क्लब राबवत असलेले उपक्रम हे समाज उपयोगी आहेत. नेत्ररोग तपासणी शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम आदी उपक्रम स्तृत्य आहेत. इतर सामाजिक संस्थांनीही अशीच कामे करावी, असेही ते म्हणाले. मनोहर खालापूरे यांनी लायन्सच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी डॉ. संदीप चव्हाण, मनोहर खालापूरे, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश घुले, मंठा नगर पंचायत उपनगराध्यक्ष शिराज पठाण आदी उपस्थिती होते.
फोटो
परतूर येथे लायन्सच्या आयोजित कार्यक्रमात बोलताना आ. राठोड व इतर.