पाण्यासाठी महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:35 IST2019-05-11T00:34:46+5:302019-05-11T00:35:59+5:30
मठपिंपळगाव येथे संतप्त महिलांनी ग्रामपंचायतवर मोर्चा काढून निषेध नोंदविला.

पाण्यासाठी महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
मठपिंपळगाव : अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथे पाणीपुरवठा योजनेतून दररोज एका गल्लीस पाणीपुरवठा केला जातो. मात्र, हा पाणीपुरवठा वेळेवर आणि ठरलेल्या गल्लीत न झल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायतवर मोर्चा काढून निषेध नोंदविला.
जाब विचारण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये गेलेल्या महिलांना उत्तर देण्यासाठी कोणीच जबादार सदस्य तथा ग्रामसेवक हजर नसल्याने महिला अधिक संतप्त झाल्या होत्या. या चिडलेल्या महिलांनी रिकाम्या खुर्चीला निवेदन ठेवून निषेध नोंदविला.
या निवेदनावर शर्मिला जिगे, मंदाबाई जिगे, पद्मा जिगे, सुशीला जिगे, चंपाबाई जिगे, राधा जिगे, कविता जिगे, अमृता जिगे, रूख्मण जिगे, सुमन जिगे, निर्मला जिगे, शकुंतला जिगे, यमुना जिगे, संगीता जिगे, तारामती जिगे, पुष्पा जिगे आदींची नावे आहेत.