विहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 11:35 IST2018-03-21T00:44:39+5:302018-03-21T11:35:42+5:30
सासरकडील जाचास कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील म्हसला येथे घडली.

विहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : सासरकडील जाचास कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील म्हसला येथे घडली. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात मंगळवारी सासरकडील व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कविता भाऊसाहेब म्हसलेकर (२७) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या संदर्भात एकनाथ कडूबा पाबळे (४६ रा. कोपर्डी, ता. भोकरदन) यांनी फिर्याद दिली आहे. कविता हिचा पती भाऊसाहेब सांडू म्हसलेकर, भाया काकासाहेब म्हसलेकर, सासू व नणंद हे शारीरिक व मानसिक छळ करून त्रास द्यायचे. तसेच विविध वस्तू खरेदीसाठी वारंवार पैशाची मागणी करत होते.
सततच्या जाचास कंटाळून कविता हिने सोमवारी शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलीस निरीक्षक बोलकर तपास करीत आहेत.