महिलेने बँकेला केले २ लाख परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:16 IST2018-11-07T00:15:26+5:302018-11-07T00:16:01+5:30

येथील लक्ष्मीबाई गुलाबराव साबळे यांनी बँक आॅफ महाराष्ट्राच्या शाखेतील कर्मचाऱ्याकडून चुकीने आलेले २ लाख ०५ हजार रुपये परत केले.

Woman returned 2 lakhs to the bank | महिलेने बँकेला केले २ लाख परत

महिलेने बँकेला केले २ लाख परत

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : येथील एका महिलाने बँक आॅफ महाराष्ट्राच्या शाखेतील कर्मचाऱ्याकडून चुकीने आलेले २ लाख ०५ हजार रुपये परत केले. त्यांनी केलेल्या या कामामुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होते.
येथील लक्ष्मीबाई गुलाबराव साबळे यांनी सोमवारी बँक आॅफ महाराष्ट्राच्या शाखेतून २५ हजार रुपये काढले. परंतु, बँकेच्या कर्मचाºयाकडून चुकीने २ लाख ५ हजार रुपये देण्यात आले. त्या पैसे न मोजताच तिथून निघून गेल्या. घरी गेल्यावर जास्त पैसे आल्याचे लक्षात आले. त्यांनी याची माहिती लगेचच जि. प. सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे यांना दिली. त्यांनी ही माहिती बँकेला कळविली. त्यानंतर लक्ष्मीबाई साबळे यांनी ही रक्कम मंगळवारी परत केली.
याप्रसंगी लक्ष्मीबाई साबळे, जि. प. सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे, दिलीप बरडे, जयंत साबळे, औचितराव साबळे, प्रभाकर साबळे, सुभाष गाढे, संजय साबळे, सुनील साबळे आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, त्यांनी रक्कम परत केल्यामुळे बँक आॅफ महाराष्ट््च्या अधिका-यांनी त्यांचे आभार मानले. तसेच गावकरी त्यांचे कौतूक करीत आहे.

Web Title: Woman returned 2 lakhs to the bank