Wife killed with knife | चाकूने वार करून पत्नीचा केला खून

चाकूने वार करून पत्नीचा केला खून

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कौटुंबिक वादातून पत्नीचा चाकूने भोसकून खून करणाऱ्या पतीविरूध्द कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जालना शहरातील मोरंडी मोहल्ला भागात सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.
शोभा भरत भालेकर (२४ रा. मोरंडी मोहल्ला, जालना) असे मयत महिलेचे नाव आहे. शोभा भालेकर या सोमवारी सकाळी घरी होत्या. त्यावेळी पती भरत एकनाथ भालेकर यांच्याशी त्यांचा वाद झाला. या वादातून भरत भालेकर याने चाकूने भोसकून शोभा यांचा खून केला. घटनेची माहिती मिळताच कदीम पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पंचनाम्यानंतर मयत महिलेचे पार्थिव शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात नेण्यात आले होते. या प्रकरणी विठ्ठल नाना पाटील (रा. बोरखेडी ता.जि.जालना) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भरत एकनाथ भालेकर विरूध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि पोवार हे करीत आहेत.
दरम्यान, पती-पत्नीमध्ये नेमके कोणत्या कारणावरून वाद झाला, याची माहिती रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही. घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करून भरत भालेकर याला ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. या घटनेने मोरंडी परिसरात मात्र, एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Wife killed with knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.