शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

पत्नी, मुलांना माहेरी ठेऊन घेतले; रागात जावयाने केला सासूचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 12:51 PM

Son-in-law killed his mother-in-law in anger : पत्नी घरी नसताना माहेरी येऊन केला चाकू आणि फरशीने हल्ला

जालना : पत्नी, मुलांना सोबत पाठवित नसल्याचा राग मनात धरून जावयाने सासूच्या डोक्यात फरशी घालून व चाकूने वार करून खून केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री जालना शहरातील प्रियदर्शनी कॉलनी, संभाजीनगर भागात घडली.

सखुबाई बिरजूलाल काळे (७५, रा. मार्बल पॅलेस, प्रियदर्शनी कॉलनी, संभाजीनगर, जालना) असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणात मयत महिलेची मुलगी ज्योती विजय धिल्लोड यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शहरातील संग्रामनगर बसस्थानक भागात राहणाऱ्या ज्याेती धिल्लोड या सोमवारी कामावर गेल्या होत्या. रात्री त्या घरी गेल्या असता त्यांची आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसून आले. मुलांकडे विचारणा केल्यानंतर मुलांनी वडील विजय किशन धिल्लोड (रा. भीमनगर भावसिंगपुरा, औरंगाबाद) यांनी सखुबाई काळे यांना फरशी, चाकूने मारहाण केल्याचे सांगितले. विजय धिल्लोड याने पत्नी, मुलांना सोबत पाठवित नसल्याचा राग मनात धरून सखुबाई काळे यांचा खून केल्याची तक्रार ज्योती धिल्लाेड यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि. रमेश रूपेकर हे तपास करीत आहेत.

जावई कोठडीतघटनेची माहिती मिळताच सदरबाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. घटनेनंतर फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या विजय धिल्लोड याला गांधीचमन भागातून अटक केली. मंगळवारी न्यायालयात हजार केले असता त्याला १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोउपनि. रमेश रूपेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAurangabadऔरंगाबादJalanaजालना