भाजीपाला तोलूनमापून घेणारा ग्राहक पेट्रोल पंपावर दूर्लक्ष का करतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:30 IST2021-03-17T04:30:53+5:302021-03-17T04:30:53+5:30

अत्यावश्यक घटक : सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर जात आहेत पेट्रोलचे दर जालना : पेट्रोल आणि डिझेल हे आता मानवी जीवनाचा अविभाज्य ...

Why does a customer weighing vegetables ignore a petrol pump? | भाजीपाला तोलूनमापून घेणारा ग्राहक पेट्रोल पंपावर दूर्लक्ष का करतो?

भाजीपाला तोलूनमापून घेणारा ग्राहक पेट्रोल पंपावर दूर्लक्ष का करतो?

अत्यावश्यक घटक : सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर जात आहेत पेट्रोलचे दर

जालना : पेट्रोल आणि डिझेल हे आता मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत. गतीमान जीवनशैलीमुळे या दोन्ही धटकांना अन्ययसाधारण महत्व आले आहेत. यातून वेळेची बचत होवून इच्छित स्थळी पोहचताना कमी खर्च लागत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आज पेट्रोल आणि डिझेल शंभरीवर पोहचले असले तरी त्याचे केवळ चर्चा होते. मात्र यामुळे कोणी वाहने वापरण्याचे टाळले आहे असे दिसत नाही.

जालना जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांमध्ये पेट्रोल पंप वाढीचा विचार केल्यास ते शहर आणि ग्रामीण भागात विकसीत झाले आहेत. आधी पेट्रोल मिळविण्यासाठी दहा ते पंधरा किलो मीटर पर्यंतचा प्रवास करावा लागे त्यामुळे अनेक जण पेट्रोल जपून वापरत असत. परंतू आता हे दोन्ही इंधन सहज गत्या कुठेही उपलब्ध होत असल्याने त्यांचा वापर वाढला असल्याचे दिसून येते.

वर्षभरात केवळ १० तक्रारी

पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी त्याचवेळी आपण पेट्रोल पंपावर जातो ज्यावेळी पेट्रोलचा काटा हा तुमच्याकडे कमी असल्याचे दर्शवितो.

त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल भरतांना केवळ पेट्रोल पंपाच्या मीटरमध्ये शून्य आहे की नाही एवढेच आपण पाहतो. नंतर भाव किती आहे. हे पाहणे विचारुन आवश्यक तेवढे तेल टाकतो.

काही ठिकाणी मापामध्ये तफावत दिसल्यावर मात्र कुठलाही वाहन चालक तेथे वाद घालतो परंतु नंतर त्याची तक्रार करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करुन पुढे निघून जातो.

दर तीन महिन्याला होते तपासणी

जवळपास सर्वच पेट्रोल आणि डिझेल पंपाची तपासणी ही जिल्हा पुरवठा विभागाकडून केली जाते. प्रत्येक पेट्रेाल पंपातील सॅम्पल घेवून ते प्रयोगशाळेकडे पाठविले जाते परंतु यावर काहीच कारवाई होत नाही.

पेट्रोल आणि डिझेल हे ग्राहाकाला वितरीत करतांना त्याचे तंतोतंत पालन झाले पाहिजे हा नियम आहे. परंतु काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये आमच्याकडे तक्रारी येतात. त्यानुसार आम्ही तक्रारदाराची दखल घेवून शहनिशा करत असतो. दोष आढळल्यास कारवाई करतो.

-जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: Why does a customer weighing vegetables ignore a petrol pump?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.