मी आयसीटी कॉलेज आमलं, मेडिकल आणलं, २०० कोटींचे रस्ते आणले, रेल्वेस्टेशन बांधतो, ७ हजार कोटींचा जळगावचा रोड चाललाय, १०० कोटींची पीट लाईन केली, ३ हजार कोटी रुपये दुहेरीकरणाला दिले. मला काहून पाडलं? असा रोकडा सवाल भाजप नेते तथा माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी जालन्यातील मतदारांना केला. ते महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित एका प्रचारसभेत बोलत होते.
...जाऊ द्या, मी घेतो सहन करून, यांना तरी नका पाडू -दानवे पुढे म्हणाले, "भल्या माणसांनो एवढा स्वस्तातला पुढारी तुम्हाला जालण्यात कुणी सापडेल का? पण आता, मला पाडलं तर पाडलं, जाऊ द्या, मी घेतो सहन करून. यांना तरी नका पाडू. यांना निवडून द्या. उगाचच काही शंका काढतात, काही भानगडी काढतात. माणून बघायचा नाही, पक्ष बघायचा. काय करायचंय माणसाशी तुम्हाला?"
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/847924421390349/}}}}
माझ्या तोंडाला पेस येतो, माझी कामे सांगून सांगून... -"तुम्ही माणूस न बघाता खासदार निवडून दिला की नाही? सांगाबरं... आला का तो आजून?" असा प्रश्न करत, "दोन वर्ष झाले, दोन लाख रुपयांचं काम जालनावाल्यांनो तुम्हाला नाही रे. माझ्या तोंडाला पेस येतो. माझी कामे सांगून सांगून." असेही दानवे म्हणाले.
Web Summary : Ex-MP Danve questioned Jalna voters about his defeat despite development work. He urged them to elect current candidates, highlighting his past contributions and criticizing voters for prioritizing party over the person, lamenting the lack of progress from his successor.
Web Summary : पूर्व सांसद दानवे ने विकास कार्यों के बावजूद अपनी हार पर जालना के मतदाताओं से सवाल किया। उन्होंने वर्तमान उम्मीदवारों को चुनने का आग्रह किया, अपने पिछले योगदानों पर प्रकाश डाला और मतदाताओं की पार्टी को व्यक्ति से ऊपर प्राथमिकता देने की आलोचना की। उन्होंने अपने उत्तराधिकारी से विकास न होने पर दुख जताया।