शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात गावठी पिस्तूल येतात कोठून ?; घृष्णेश्वर चौकात पिस्तुलासह दोघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 15:05 IST

तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

ठळक मुद्देयापूर्वी अटकेतील आरोपी सुनील वनारसेच होता पुरवठादारपिस्तूल आयातीचा पत्ता मिळेना

जालना : गावठी पिस्तूल वापरणाऱ्या दोघांना सदरबाजार पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई सोमवारी पहाटेच्या सुमारास जालना शहरातील घृष्णेश्वर चौकात करण्यात आली. पोलिसांनी पिस्तूल, कारसह एकूण १ लाख ८० हजार ४५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, पोलिसांनी यापूर्वीच अटक केलेल्या सुनील वनारसे याने या पिस्तूलचा पुरवठा केल्याचे समोर आले आहे.

गावठी पिस्तूल बाळगणारा युवक एका कारमधून जात असल्याची माहिती सदरबाजार पोलीस ठाण्याचे पोनि संजय देशमुख यांना मिळाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांना माहिती देऊन त्यांच्यासह देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील घृष्णेश्वर चौकात सापळा रचला. त्यावेळी मंठा चौफुलीकडून भरधाव वेगात आलेल्या कारला (क्र.एम.एच.२२- ए.एम.१६१३) थांबविण्यात आले. आतील विकास जयराम शिंदे (रा. पांगारकर नगर, जालना), किशोर दामोदर घुगे (रा. स्वामी समर्थ नगर, जालना) या दोघांची चौकशी केली. त्यावेळी विकास शिंदे याच्याकडे एक गावठी पिस्तूल आढळून आले. त्यांच्याकडील पिस्तूलसह कारसह मोबाईल, काठी व इतर साहित्य असा एकूण १ लाख ८० हजार ४५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

पितस्तूल खरेदीबाबत विचारणा केल्यानंतर ती पिस्तूल सुनील वनारसे (रा. नूतन वसाहत, जालना) याच्याकडून ३० हजार रूपयांमध्ये खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी वरील तिघांविरूध्द सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोनि संजय देशमुख, पोउपनि रमेश रूपेकर, कर्मचारी संदीप बोन्द्रे, समाधान तेलंग्रे, सुधीर वाघमारे, योगेश पठाडे, साई पवार, सोपान क्षीरसागर, फुलचंद गव्हाणे, स्वप्नील साठेवाड, जतीन ओहोळ यांच्या पथकाने केली.

पळून जाण्याचा प्रयत्नपोलिसांनी घृष्णेश्वर चौकात नाकाबंदी केली होती. पोलिसांनी केलेली नाकाबंदी पाहून कार चालकाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची काटेकोर नाकाबंदी असल्याने ते दोघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

पिस्तूल आयातीचा पत्ता मिळेनाजालना पोलिसांनी गत काही महिन्यात जवळपास १४ गावठी पिस्तूल जप्त केल्या आहेत. यातील अनेक पिस्तूल या सुनील वनारसे याने विक्री केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. वनारसे विरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, तो जेलमध्ये आहे. मात्र, पोलिसांच्या विविध गुन्ह्यातील तपासामध्ये वनारसे याने किंवा इतर आरोपींनी या गावठी पिस्तूल आणल्या कोठून याचा पत्ता पोलिसांना लागेला नाही. काही राज्यात पोलिसांची पथकेही गेली. मात्र, मिळालेली माहिती चुकीची असल्याचे तेथे गेल्यानंतर पथकाच्या लक्षात आले.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक