शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
2
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
3
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
4
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
5
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
6
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
7
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
8
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
9
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
10
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
11
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
12
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
13
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
14
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
15
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
16
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
17
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
18
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
19
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
20
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?

सत्तेत असताना इव्हीएम विश्वसनीय होते का?- देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:54 AM

इव्हीएममध्ये विरोधकांना दोष कसा दिसतो, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी अंबड येथे आयोजित जाहीर सभेत केला

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : केंद्रासह महाराष्ट्रात काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने दहा वर्षे सत्ता भोगली. त्यावेळच्या निवडणुका या देखील इव्हीएमवरच झाल्या होत्या. त्यामुळे इव्हीएम चांगले होते आणि आता आम्हाला जनता विजयी करत आहे, तर इव्हीएममध्ये विरोधकांना दोष कसा दिसतो, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी अंबड येथे आयोजित जाहीर सभेत केला. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंधरा वर्ष आणि आमचे पाच वर्ष या काळातील जो विकास आम्ही केला त्यावर खुली चर्चा झाल्यास ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होईल, असे आव्हानही विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी दिले.अंबड येथील दत्ताजी भाले मैदानावर महाजनादेश यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पालकमंत्री बबनराव लोणीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, भाजपाचे उपप्रदेशाध्यक्ष आ. सुजितसिंह ठाकूर, आ. नारायण कुचे, नगराध्यक्षा संगीता कुचे, शीतल कुचे, जिल्हा उपाध्यक्ष दीपकसिंग ठाकूर, शहराध्यक्ष संदीप खरात, नगरसेवक सौरभ कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना फडणवीस यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आघाडी सरकारने केवळ २० हजार कोटी रूपये देऊ केले होते. ते आम्ही ५० हजार कोटी रूपये दिले. यासह दुष्काळी अनुदान, बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान इ. मदत ही वेगळी असे त्यांनी नमूद केले. मराठवाड्याच्या पाचवीला दुष्काळ पुजलेला आहे, तो भविष्यात भूतकाळ होईल, असे सांगून सिंचन, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य मिटविणयसाठी वॉटरग्रीड प्रकल्पासाठी २० हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. तसेच समुद्राचे १६७ टीमएमसी पाणी गोदावरीत आणून ते पाईपलाईने मराठवाड्यात वितरित करण्याची योजना आहे.गेल्या पाचवर्षात १८६ पाणी योजनांची कामे पूर्ण केली असून, रस्ते, आरोग्य, शिक्षण तसेच राष्ट्रीय महामार्ग, समृध्दी महामार्ग आदी विकास कामांमुळे राज्याचा चेहरामोहरा बदलल्याचा दावा फडणवीस यांनी केला.जालन्यात आयसीटी ही प्रतिष्ठित शिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जे प्रयत्न केले, त्यामुळे उच्च शिक्षणाची मोठी संधी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी रावसाहेब दानवे यांनी देखील विरोधकांवर टीकेचे प्रहार करून गेल्या पाचवर्षात जितका विकास झाला तितका काँग्रेसने कधीच केला नसल्याचे सांगितले. जालना ते अंबड रस्त्यासाठी आम्ही ३५० कोटी रूपये मंजूर केल्यानेच अपघातांचे प्रमाण कमी होऊन प्रवास गतिमान होण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी आ. नारायण कुचे यांनी गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने अंबडला पाणीपुरवठा योजनाही केली नाही. आम्ही पाचवर्षात चौफेर विकास साधला. या कामी वरिष्ठ नेत्यांची साथ मिळाल्यानेच हे शक्य झाल्याचे कुचे यांनी सांगितले.अंबड : गाडीतूनच हारतुरे स्वीकारल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोडगेवराई येथून मुख्यमंत्री सभा आटोपून अंबडकडे जात होते. त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस हे गाडीच्या खाली उतरतील, अशी आशा होती, परंतु ती फोल ठरली. त्यांनी गाडीतून हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन केले.जे त्यांच्या गाडीजवळ होते, त्यांचा सत्कार त्यांनी घेतला. यामुळे पदाधिकारी, कार्यर्त्यांचा हिरमोड झाला. यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष किरण खरात, अंबड तालुका उपाध्यक्ष पांडुरंग खरात, सर्कलप्रमुख नजीर शहा, अनिरुद्ध झिंजुर्डे, सय्यद गफूर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीEVM Machineएव्हीएम मशीनMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्रा