जालन्यात वारकऱ्यांकडुन २६ जानेवारी पासून स्वच्छतेचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 19:46 IST2019-01-17T19:44:04+5:302019-01-17T19:46:28+5:30
प्रबोधनाच्या माध्यमातून परिवर्तन करणार.

जालन्यात वारकऱ्यांकडुन २६ जानेवारी पासून स्वच्छतेचा जागर
जालना : समाजातील अंध्दश्रध्दा, व अनिष्ठ रुढी परंपरांवर प्रबोधन करुन आदर्श समाज निर्मितीसाठी मह्त्वपूर्ण योगदान देणारा वारकरी संप्रदाय आता जिल्ह्यातील हागणदारीवर प्रबोधनाच्या माध्यमातून परिवर्तन करणार आहे.
शासनाने राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी वारकरी सांप्रदायाचा सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील वारकरी सांप्रदायाचे प्रवचनकार, कीर्तनकार आणि जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाची पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. यावेळी सांप्रदाय मंडळींनी आपल्या प्रवचन, कीर्तनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन स्वच्छतेचा जागर करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, ह.भ.प. नरहरी बुवा चौधरी महाराज, जिल्हा वारकरी सांप्रदाय अध्यक्ष ह.भ.प. विलास देशमुख महाराज, ह.भ.प. श्रीराम सोरमारे महाराज, उप मुख्य कार्यक्ररी अधिकारी संजय इंगळे यांची उपस्थिती होती. २६ जानेवारीपासून ते १० फेब्रुवारी पर्यंत जिल्ह्यातील निवडक २० ते ३० वारकरी प्रत्येक गावात जाऊन स्वच्छतेबाबत प्रबोधन करणार आहेत. वारकरी साहित्य परिषदे मार्फतच सदर वारकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.