वानरांमुळे उटवद येथील ग्रामस्थ त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST2021-02-07T04:28:14+5:302021-02-07T04:28:14+5:30
माता रमाई जयंतीनिमित्त व्याख्यान कार्यक्रम जालना : तालुक्यातील रामनगर येथे माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन ...

वानरांमुळे उटवद येथील ग्रामस्थ त्रस्त
माता रमाई जयंतीनिमित्त व्याख्यान कार्यक्रम
जालना : तालुक्यातील रामनगर येथे माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सत्यशोधक वारकरी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष रामेश्वर तिरूखे यांचे ‘त्यागमूर्ती माता रमाईचा संघर्ष’ या विषयावर व्याख्यान होणार असल्याची माहिती भारतीय बौध्द सभेच्यावतीने देण्यात आली.
अहंकार देऊळगाव येथे मास्कचे वाटप
जालना : तालुक्यातील अहंकार देऊळगाव येथील विद्यार्थ्यांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच बाबासाहेब सोमधाने, देविदास सोमधाने, चंद्रकांत खरात, गोपाळ खरात, मोकींदा खरात, कृष्णा सोमधाने, राजू वाडेकर, भागवत मस्के, संजय खरात, राजेंद्र खरात, परमेश्वर खरात, राजू खरात आदींची उपस्थिती होती.
सेवानिवृत्त सैनिकांचा तळेगाव येथे सत्कार
भोकरदन : तालुक्यातील तळेगाव येथे सेवानिवृत्त सैनिक काकासाहेब गव्हाड, बाबासाहेब गव्हाड, अशोक गव्हाड यांचा ग्रामस्थांच्यावतीने शुक्रवारी सत्कार करण्यात आला. यावेळी कैलास गव्हाड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कडुबा गव्हाड, संजय फलके, ज्ञानेश्वर फलके यांच्यासह युवक, ग्रामस्थांची उपस्थिती होती.