मोफत ऊस नेण्यासाठी सरसावले ग्रामस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:27 IST2018-09-09T00:27:36+5:302018-09-09T00:27:57+5:30

घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बु. येथील शेतकरी दतात्रय विठ्ठलराव दहिफळे यांच्या तीन एकरातील उस हुमनी अळीने पोखरला आहे.

The villagers have come to take free sugarcane | मोफत ऊस नेण्यासाठी सरसावले ग्रामस्थ

मोफत ऊस नेण्यासाठी सरसावले ग्रामस्थ

लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभारपिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बु. येथील शेतकरी दतात्रय विठ्ठलराव दहिफळे यांच्या तीन एकरातील उस हुमनी अळीने पोखरला आहे.
उसाचे संगोपन करुनही हाती काही लागण्याची शक्यता नसल्याने दहिफळे यांनी शनिवारी सकाळी मोफत उस तोडून नेण्याचे ग्रामस्थांना आवाहन करताच हा ऊस नेण्यासाठी ग्रामस्थांनी शेतात गर्दी केली होती. काही वेळातच ग्रामस्थांनी तीन एकरातील ऊस तोडून नेला.
जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून परिसरात सिंचनासाठी पाणी मिळत असल्याने अंबड आणि घनसावंगी तालुक्यात हजारो हेक्टरवर उसाची लागवड केली आहे. उस चांगला बहरात असतांना हुमनी अळीने उस पोखरल्याने पीके पिवळे पडली आहेत.

Web Title: The villagers have come to take free sugarcane