शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आकाशातून अज्ञात यंत्र शेतात कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ; यंत्राबाबत रंजक माहितीसमोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 14:00 IST

गावकऱ्यांनी तातडीने ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.

भोकरदन (जि. जालना) : भोकरदन तालुक्यातील रेलगाव येथे गुरुवारी सकाळी शेतकरी सत्यवान मिसाळ यांच्या शेतात आकाशातून एक अज्ञात उपकरण कोसळल्याने गावात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, प्रशासनाच्या तपासणीनंतर हे उपकरण हवामान निरीक्षणासाठी वापरले जाणारे ‘वेदर सॉनड’ असल्याचे स्पष्ट झाल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.

सत्यवान मिसाळ यांच्या शेतात सकाळी हे उपकरण पडलेले दिसले. या विचित्र आकाराच्या उपकरणाला पांढऱ्या, रबरासारख्या पिशवीची आणि लांबलचक दोरीची जोडणी केलेली होती. हे दृश्य पाहून ग्रामस्थांमध्ये काही काळ भीती आणि संभ्रम निर्माण झाला. अनेकांना हे एखादे संशयास्पद किंवा धोकादायक साहित्य वाटले; तर काहींनी ते ड्रोनचे अवशेष किंवा स्फोटक यंत्रासारखे असल्याचा कयास लावला. गावकऱ्यांनी तातडीने ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तपासणी केली असता, हे उपकरण ‘वेदर सॉनड’ असल्याचे स्पष्ट झाले. 

दररोज अशी अनेक उपकरणे आकाशात‘वेदर सॉनड’ हे यंत्र तापमान, आर्द्रता, वायुदाब (प्रेशर) आणि हवामानाशी संबंधित इतर माहिती गोळा करण्यासाठी वापरले जाते. हे उपकरण मोठ्या बलूनसोबत आकाशात सोडले जाते. वातावरणाच्या उंच थरांमध्ये बलून फुटल्यानंतर हे हलके उपकरण वाऱ्याच्या दिशेने जमिनीवर कुठेही पडते. अशा प्रकारच्या यंत्रामध्ये कोणतेही धोकादायक रसायन किंवा स्फोटक पदार्थ नसतो. भारतातील हवामान विभाग तसेच काही खासगी संशोधन संस्था दररोज अशी उपकरणे आकाशात सोडतात. त्यामुळे ही उपकरणे शेकडो किलोमीटर लांब अनोळखी ठिकाणी पडणे ही एक सामान्य बाब असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Weather device from sky startles villagers; interesting details revealed.

Web Summary : A weather monitoring device ('weather sonde') fell in a Jalna farm, causing initial panic. Authorities clarified it poses no danger, used for atmospheric data collection by weather agencies and research institutes, dispelling fears.
टॅग्स :environmentपर्यावरणJalanaजालना