विलास औताडे करोडपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:59 IST2019-03-30T23:59:25+5:302019-03-30T23:59:37+5:30
लोकसभेच्या जालना मतदार संघामध्ये निवडणूक लढविणारे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार करोडपती असल्याचे त्यांनी निवडणूक नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केलेल्या शपथपत्रावरुन स्पष्ट झाले आहे.

विलास औताडे करोडपती
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकसभेच्या जालना मतदार संघामध्ये निवडणूक लढविणारे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार करोडपती असल्याचे त्यांनी निवडणूक नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केलेल्या शपथपत्रावरुन स्पष्ट झाले आहे. त्यांच्या विरुध्द धनादेशाचा अनादर करणे, आचार संहिता भंगाच्या गुन्ह्याव्यतिरिक्त दुसरा कुठलाही गुन्हा दाखल नसून, त्यांची जगंम मालमत्ता १ कोटी ४७ लाख ऐवढी आहे. तर त्यांना जवळपास विविध बँकांच्या कर्जापोटी १ कोटी ५६ लाख रुपयांचे देणे बाकी आहे.
जालना लोकसभा मतदार संघात विलास औताडे सलग दुसऱ्यादा निवडणूक लढवत असून, त्यावेळी देखील त्यांनी खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरुध्द टक्कर दिली होती. त्यावेळी त्यांना ३ लाख ८५ हजार मते मिळाली होती.
२०१९ मध्ये दिलेल्या शपथपत्रात औताडे यांनी दर्शविलेल्या संपत्तीमध्ये त्यांनी प्राप्तीकर विभागाचे विवरण पत्र भरतांना त्रुटी ठेवल्याचे दिसून येते. २०१४ - १५ मध्ये त्यांचे उत्पन्न ५९ लाख रुपये दशर्विले आहे.
तर २०१५-१६ मध्ये कुठलेच उत्पन्न झाले नसल्याचे नमृद केले आहे. त्यांच्याकडे ठेवीच्या रुपात १५ लाख ४२ हजार रुपये असून, पत्नीच्या नावे ५० हजार रुपयांच्या ठेवी आहेत. विलास औताडे यांनी शेअर्समध्ये १८ लाख ६० हजार रुपयांची गुतवणूक केली असून, एलआयसीमध्ये ३ लाख तर पत्नीच्या नावे १ लाखांची एलआयसी आहे.
एकूणच औताडेंनी सर्व ती माहिती शपथपत्रात दिली आहे.
औताडेकडे चार कार असून, दोन दुचाकी आहेत. त्यांनी विविध क्षेत्रातील नागरिकांना ५० लाख रुपयांचे कर्ज दिले होते. विलास औताडेंकडे १८ तोळे सोने असून, त्यांच्या पत्नीकडे २० तोळे सोने आहे. विलास औताडे यांच्याकडे ३५ एकर शेती असून, शासकीय देणी १ कोटी ५६ लाख रुपयांची आहे. तर वादग्रस्त शासकीय देणी २३ लाख रुपयांची आहे. विलास औताडे यांचे शिक्षण औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात बीए प्रथम वर्षा पर्यंत झाले आहे.