मराठा क्रांती मोर्चाप्रणीत शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:57 IST2021-02-21T04:57:02+5:302021-02-21T04:57:02+5:30
यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात ...

मराठा क्रांती मोर्चाप्रणीत शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने विविध उपक्रम
यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सजविलेल्या रथात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ‘जय भवानी जय शिवराय’, ‘तुमचं आमचं नात काय जय भवानी जय शिवराय’ अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. ही मिरवणूक गांधी चमन, मस्तगड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ विसावली. मंत्रोच्चारात दुग्धाभिषेक करण्यात आला.
समितीचे अध्यक्ष शेख इब्राहिम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अभिमन्यू खोतकर, अक्षय गोरंट्याल, ॲड. दीपक कोल्हे, संतोष गाजरे, अरविंद देशमुख, ज्ञानेश्वर ढोबळे, जगन्नाथ काकडे, महेश निकम, सचिन कचरे, धनसिंग सूर्यवंशी, विक्की हिवाळे, गणेश धायडे, आकाश ढेंगळे, करण जाधव, शुभम टेकाळे, पृथ्वीराज भुतेकर, गोपाल चित्राल, आकाश जगताप, मिलिंद गंगाधरे, योगेश पाटील, प्रा. नरसिंग पवार, रमेश गजर, चंद्रकांत भोसले, अर्जुन पाथरकर, प्रभाकर केदारे, अमित कुलकर्णी, दत्ता लहाने, अंकुश देशमुख, अमोल चिखले, किसन परळकर, प्रशांत लहाने, आदींची उपस्थिती होती.
गडकोटाचा देखावा लक्षवेधी
मराठा क्रांती मोर्चा प्रणीत शिव जन्मोत्सव समितीने यंदा प्रथमच महाराजांची डिजिटल प्रतिमा गांधी चमन येथे उभारली होती. याच ठिकाणी गडकोटांचा माहिती देणारी प्रदर्शनी भरविण्यात आली होती. शेकडो शिवप्रेमींनी या ठिकाणी भेटी देऊन या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.