शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

वैष्णव वाढेकर प्रथम, तर आदिती सुरंगळीकर द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 1:11 AM

महाराष्ट्रावर बोलू काही .... युवा जागर ‘युवा संसद’ स्पर्धेची जिल्हाफेरी सोमवारी पार पडली. या स्पर्धेत वैष्णव वाढेकर प्रथम, आदीती सुरंगळीकर दितीय तर तेजस नांगरे यांनी तृतीय क्रमांक पटकविला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाराष्ट्रावर बोलू काही .... युवा जागर ‘युवा संसद’ स्पर्धेची जिल्हाफेरी सोमवारी पार पडली. या स्पर्धेत वैष्णव वाढेकर प्रथम, आदीती सुरंगळीकर दितीय तर तेजस नांगरे यांनी तृतीय क्रमांक पटकविला.या स्पर्धेत जिल्ह्यातील २४ स्पर्धकांनी विविध सामाजिक विषयांवर विचार मंथन केले. जालना जिल्हा परिषदेच्या स्व.यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या जिल्हाफेरीचे उद्घाटन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी मंगल धुपे, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रमोदिनी अमृतवाड, उपशिक्षणाधिकारी रमेश तांगडे, डॉ. सुहास सदाव्रते, प्रा. दिगंबर दाते, रंगनाथ खेडेकर, प्राचार्य कांबळे, प्रा. संजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हा फेरीत २४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यांनी स्वच्छ भारत मिशन, पीकविमा, उज्ज्वला योजना अशा १४ शासकीय योजनांवर विचार मंथन केले. यात वैष्णव वाढेकर प्रथम, आदिती सुरंगळीकर द्वितीय तर तेजस नांगरे यांनी तृतीय क्रमांक पटकविला. हे स्पर्धक मुंबई येथे होणाऱ्या स्पर्धेत जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत. प्रशिक्षक म्हणून प्रा. डॉ. अशोक पाठक, प्रा. डॉ. सुजाता देवरे, डॉ. कैलास इंगळे यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. सुहास सदाव्रते, प्रा. रंगनाथ खेडेकर, प्रा. दिगंबर दाते, प्रा. संजय चौधरी, डॉ. विद्या दिवटे, डॉ. विजय कुमठेकर, प्रा. अशोक आहेर, डॉ. प्रभाकर शेळके आदींनी परिश्रम घेतले.सत्राच्या दुस-या टप्प्यात प्रश्न, उत्तराचा तास घेण्यात आला. यात विरोधकांनी स्थानिक प्रश्नावरुन सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यात दुष्काळ, पाणी इ. विषयांवरुन विरोधकांनी सत्ताधा-यांना घेरले होते. तर सत्ताधारी पक्षानेही विरोधकांच्या प्रश्नाला सडेतोड उत्तरे दिली. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी अनुभवले सभागृहाचे कामकाजविद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विधानसभा सभागृहाचे कामकाज कसे चालते. याचा अनुभव मिळावा, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा फेरीमध्ये विधानसभा सभागृहात ज्याप्रमाणे कामकाज चालते. त्याचप्रमाणे अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली.यात अध्यक्ष म्हणून मोनिका जाधव, सभागृह नेता वैष्णव वाढेकर, विरोधी पक्षनेता तेजस नांगरे, मंत्री आदिती सुरंगळीकर, ऋषिकेश मोरे, तरन्नुम फेरोज बेग, संध्या व्यवहारे, राहुल गोंडगे, उजमा शेख, सतीश पाटोळे तर विरोधी गटामध्ये पवन मोरे, योगेश वैद्य, रेणुका शिंदे आदी सहभागी होते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रParliamentसंसदStudentविद्यार्थीSocialसामाजिकgovernment schemeसरकारी योजना