शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
2
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
3
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
4
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
5
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
6
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
7
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
8
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
9
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
10
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
11
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
12
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
13
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
14
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
15
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
16
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
17
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
18
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
19
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
20
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले

'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 20:30 IST

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार अनुदान द्या; मागणी पूर्ण न झाल्यास मराठवाड्यातील शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरणार

- पवन पवारवडीगोद्री (जालना): "सरकार म्हणतय कर्जमाफी योग्य वेळी करू, पण सरकारची योग्य वेळ कधी येणार?" असा संतप्त सवाल विचारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील महाकाळा येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. केंद्र सरकारच्या 'PM केअर फंडा' तून २५ ते ५० हजार कोटी रुपये काढून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करा, अशी थेट मागणी त्यांनी केली.

नोटीस शिवसेना शाखेत जमा करागुरुवारी सायंकाळी अंबड तालुक्यातील महाकाळा येथे उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, तूर आणि मोसंबीसारख्या फळ पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले, ज्यामुळे लागवडीचा खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. या संकटाच्या काळात आत्महत्या करू नका, असे भावनिक आवाहन करत ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच, बँकांच्या ज्या नोटीस शेतकऱ्यांना येत आहेत, त्या सगळ्या एकत्र करून जवळच्या शिवसेना शाखेत जमा कराव्यात, यावर पुढे काय करायचे, ते आम्ही बघतो, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

'पंजाबच्या धर्तीवर ५० हजार अनुदान द्या'यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंजाब सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान दिल्याचे उदाहरण देत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीही तेवढेच हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली.

लाडक्या बहिणीचे संकट दूर होईल का?ठाकरे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'लाडक्या बहिणीला पैसे देतो' या विधानावरही टीका केली. "१५०० रुपये महिना देऊन लाडक्या बहिणीचे संकट दूर होईल का?" असा सवाल त्यांनी अजित पवारांना केला.

'कर्जमाफी नाही केली तर रस्त्यावर उतरणार'जर सरकारने थोड्या दिवसांत कर्जमाफी केली नाही, तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांसोबत खांद्याला खांद लावून रस्त्यावर उतरू, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, विनोद घोसाळकर, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख महेश नळगे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Thackeray Demands PM CARES Fund for Farmer Loan Waivers

Web Summary : Uddhav Thackeray urged the government to use PM CARES funds for farmer loan waivers in Maharashtra. He criticized insufficient aid, demanded Punjab-level subsidies, and threatened protests if demands weren't met. He instructed farmers to submit bank notices to Shiv Sena branches.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेJalanaजालनाRainपाऊसFarmerशेतकरी