भोकरदन (जि. जालना): जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील एका शेतमजुराच्या मुलाने यशाला गवसणी घातली आहे. भिकन जगन रोजेकर याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत ८१२ वा रँक मिळवून यश संपादन केले आहे. भिकनला 'आयपीएस' (IPS) कॅडर मिळण्याची दाट शक्यता असून, त्याच्या या यशामुळे भोकरदन तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सालगड्याचा मुलगा, संघर्षाची गाथाभिकनचे आई-वडील एकेकाळी चाळीसगाव तालुक्यातील वाडा येथे एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून कामाला होते. आई बेबीबाई शेतात रोजमजुरी करायच्या. घरची परिस्थिती बेताची असतानाही आई-वडिलांनी मुलांना शिकवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. भिकनचा लहान भाऊ विकास हा महिनाभरापूर्वीच 'आसाम फायटर' आर्मीत भरती झाला आहे, तर आता मोठा मुलगा भारतीय नागरी सेवेत अधिकारी झाला आहे. आईचा अपघात झाल्यामुळे त्या अपंग झाल्या, मात्र वडिलांनी कष्टाची साथ सोडली नाही.
पाचव्या प्रयत्नात स्वप्न साकारभिकनने आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जळगाव सपकाळमध्ये पूर्ण केले, तर पदवीचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालयातून घेतले. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने दिल्ली गाठली. पहिल्या चार प्रयत्नात त्याला अपयश आले, मात्र खचून न जाता पाचव्या प्रयत्नात त्याने रात्रीचा दिवस करून हे यश मिळवले. "अभ्यासात सातत्य आणि संघर्षाची तयारी असेल तर यश नक्की मिळते," अशी भावना भिकनने व्यक्त केली आहे. या यशानंतर गावात गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला.
आई वडिलांच्या त्यागाला सलामआई-वडील निरक्षर आहेत. मात्र त्यांनी आम्हा दोघां भावांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले. आम्ही शिकलो नाही पण तुम्ही शिकून मोठे व्हावे, असे त्यांचे स्वप्न होते. काही दिवसांपूर्वी आई अपघातात अपंग झाली आहे. या परिस्थितीत देखील वडिलांनी आम्हाला काहीच कमी पडू दिले नाही. अभ्यासात सातत्य ठेवले तर यश नक्की मिळते. - भिकन रोजेकर
Web Summary : Jalna's Bhikan Rojekar, son of a farmhand, cleared UPSC with 812th rank through perseverance. Overcoming financial hardship and parental sacrifices, Bhikan secured potential IPS cadre. His success brings pride to Bhokardan, proving dedication leads to achievement, even after initial failures.
Web Summary : जालना के भिकन रोजेकर, एक खेतिहर मजदूर के बेटे, ने लगन से यूपीएससी में 812वीं रैंक हासिल की। वित्तीय कठिनाइयों और माता-पिता के बलिदानों को पार करते हुए, भिकन ने संभावित आईपीएस कैडर हासिल किया। उनकी सफलता भोकरदन के लिए गर्व लेकर आती है, यह साबित करते हुए कि समर्पण शुरुआती विफलताओं के बाद भी उपलब्धि की ओर ले जाता है।