जालन्यात विनापरवाना शस्त्र बाळगणारा अटकेत, तीन तलवारी जप्त

By दिपक ढोले  | Updated: July 20, 2023 19:30 IST2023-07-20T19:29:53+5:302023-07-20T19:30:13+5:30

या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Unlicensed weapon holder arrested in Jalna: Three swords seized | जालन्यात विनापरवाना शस्त्र बाळगणारा अटकेत, तीन तलवारी जप्त

जालन्यात विनापरवाना शस्त्र बाळगणारा अटकेत, तीन तलवारी जप्त

जालना : जालना शहरातील मिलत्तनगर येथे विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यास कदीम पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. जुबेर खान हनिफ खान (२६, रा. सिटी चौक, मिलत्तनगर, जुना जालना) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून तीन हजार ५०० रुपये किमतीच्या तीन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

मिलत्तनगर येथे एक जण तीन धारदार तलवारी बाळगत असल्याची माहिती कदीम पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक माने, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव नांगरे यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सदरील ठिकाणी छापा टाकून संशयित जुबेर खान हनिफ खान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दाेन हजार रुपये किमतीची तलवार, ५०० रुपये किमतीची तलवार आणि एक हजार रुपये किमतीची एक तलवार जप्त केली आहे. या प्रकरणी ज्ञानदेव नांगरे यांच्या फिर्यादीवरून संशयिताविरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल जायभाये हे करीत आहेत.

Web Title: Unlicensed weapon holder arrested in Jalna: Three swords seized