इंदेवाडी येथे विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:35 IST2021-01-16T04:35:13+5:302021-01-16T04:35:13+5:30

रामनगर येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी जालना : तालुक्यातील रामनगर साखर कारखाना येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात ...

University Name Expansion Day celebrated at Indewadi | इंदेवाडी येथे विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

इंदेवाडी येथे विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

रामनगर येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी

जालना : तालुक्यातील रामनगर साखर कारखाना येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विशाल साळवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पं. स. सदस्य सुनील कांबळे, समता विद्यार्थी आघाडीचे विशाल साळवे, हिकमतदादा उढाण प्रतिष्ठानचे गजानन बरडे, गणेश डोंगरे, गैबीनाथ चापायतकर, उमेश सानप यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

क्रीडा पुरस्कारासाठी अभिप्राय नोंदीचे आवाहन

जालना : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती खेळाडू, साहसी, दिव्यांग खेळाडू आदी विविध पुरस्कारांच्या नियमावलीत सुधारणा करणे प्रस्तावित आहे. त्यामुळे खेळाडू, नागरिक व संघटनांनी आपले अभिप्राय शासकीय संकेतस्थळावर ई-मेल करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी प्रमोदिनी अमृतवाड यांनी केले आहे.

Web Title: University Name Expansion Day celebrated at Indewadi