परतूरनजीक अनोख्या पध्दतीने कोळसा निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:37 IST2018-11-26T00:36:26+5:302018-11-26T00:37:20+5:30
परतूर शहराजवळील निम्न दुधनेच्या काठावर डागवनात अत्यंत गरिबीतून दिवस काढणाऱ्या भटक्या जमातीतील लोकांनी दर्जेदार कोळशाची निर्मिती आरंभली आहे.

परतूरनजीक अनोख्या पध्दतीने कोळसा निर्मिती
शेषराव वायाळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : परतूर शहराजवळील निम्न दुधनेच्या काठावर डागवनात अत्यंत गरिबीतून दिवस काढणाऱ्या भटक्या जमातीतील लोकांनी दर्जेदार कोळशाची निर्मिती आरंभली आहे. या कोळशाचे वैशिष्ट्य म्हणजे जो जळताना त्यातून धुराचे प्रमाण हे नगण्य असल्याचा दावा करण्यात आला आहे.
एकूणच निम्न दुधना प्रकल्पाच्या निर्मितीमुळे परिसरातील २५ ते ३० गावांचे पुनर्वसन झाले आहे. हे पुनर्वसन होताना सर्व त्या सोयी-सुविधांनी युक्त अशी वसाहत दिली जाईल असे आश्वासन त्यावेळी दिले होते. मात्र, आज या भागात फेरटका मारला असता, त्या भागात जाण्यासाठी पक्का रस्ता तर सोडाच; परंतु पायवाटही नीट नाही. बाकीच्या सुविधांबद्दल न बोललेलेच बरे. अशाही स्थिती या भागात थांबून परिसरातील जंगलातून वाळलेली लाकडे जमा करून त्याचे तुकडे करून विशिष्ट प्रकारची भट्टी लावून या कोळशाची निर्मिती केली जात आहे.
या भट्ट्यांची पाहणी केली असता त्यातूनही धूर कुठून निघतो, हे शोधावे लागते. धूर हवेत जाण्यासाठी छोटेशे छिद्र ठेवण्यात आले आहे. एकूणच या कोळशाच्या निर्मितीमुळे हक्काचा रोजगार मिळाला आहे. दरम्यान या कोळशाला जालन्यासह अन्य भागात मोठी मागणी असल्याने एक सक्षम पर्याय कोळसा ठरत आहे.