रावसाहेब दानवेंच्या भोकरदन तालुक्यात भाजप सुसाट: पहिल्या फेरीत ४ ग्रामपंचायतीवर विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 11:33 AM2022-12-20T11:33:08+5:302022-12-20T11:34:10+5:30

पहिल्या फेरीच्या निकालानंतर भाजपाच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांना जल्लोष केला.

Union Minister Raosaheb Danven's Bhokardan taluk BJP wins: Victory in 4 Gram Panchayats in the first round | रावसाहेब दानवेंच्या भोकरदन तालुक्यात भाजप सुसाट: पहिल्या फेरीत ४ ग्रामपंचायतीवर विजय

रावसाहेब दानवेंच्या भोकरदन तालुक्यात भाजप सुसाट: पहिल्या फेरीत ४ ग्रामपंचायतीवर विजय

googlenewsNext

- फकिरा देशमुख
भोकरदन (जालना) :
तालुक्यात रविवारी ३२ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी होऊन निकाल लागण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या फेरीत लागलेल्या ५ ग्रामपंचायतीच्या निकालात भाजप पुरस्कृत पॅनलने आघाडी घेतली आहे. ४ ग्रामपंचायतीवर भाजप तर एका ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा उमेदवार सरपंच म्हणून विजयी झालेला आहे.

मंगळवारी शहरातील नगर परिषदेच्या मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. आपल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी तालुक्यातील उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी उसळली आहे. पहिल्या फेरीत करजगाव वरुड बु मोहळाई राजूर आणि निंबोळा या ग्रामपंचायतीच्या मतदानाची मोजणी झाली. यात करजगावच्या सरपंचपदी राष्ट्रवादी स्वाती लक्कस, वरुड बु.च्या सरपंचपदी  भाजपाच्या इंदूबाई पालकर, मोहळाईच्या सरपंचपदी भाजपाच्या रेणुका पालकर आणि भोकरदनच्या राजकारणा महत्वाची मानल्या जाणारी राजूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाच्या प्रतिभा भुजंग यांचा विजय झाला. तर निबोळा गावच्या सरपंचपदी देखील भाजपाच्या दुर्गाबाई निर्मळ यांची वर्णी लागली आहे. पहिल्या फेरीच्या निकालानंतर भाजपाच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांना जल्लोष केला.

Web Title: Union Minister Raosaheb Danven's Bhokardan taluk BJP wins: Victory in 4 Gram Panchayats in the first round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.