धावडा परिसरातील वीज पुरवठा पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:28 IST2021-02-20T05:28:45+5:302021-02-20T05:28:45+5:30
वीज कंपनीने थकीत वीज बिलामुळे कृषिपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला होता. विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने ...

धावडा परिसरातील वीज पुरवठा पूर्ववत
वीज कंपनीने थकीत वीज बिलामुळे कृषिपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला होता. विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने रबीतील पिके धोक्यात आली होती. ही बाब पाहता भाजपचे पदाधिकारी, शेतकऱ्यांनी बुधवारी महावितरणचे अभियंता दीपक तुरे यांना उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर गुरुवारी धावडा येथील महावितरणच्या कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांचा खंडित केलेला वीज पुरवठा त्वरित सुरू करावा अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर धावडा येथील प्रभारी अभियंता गावंडे यांनी परिसरातील वीज पुरवठा पूर्ववत केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजिंक्य वाघ, पंचायत समिती सदस्य गणेश इंगळे, डॉ. प्रमोद कुलकर्णी, लक्ष्मण मळेकर व इतरांची उपस्थिती होती.