शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

पाच सभापतींची बिनविरोध निवड

By admin | Updated: January 1, 2015 00:25 IST

जालना : नगरपालिकेच्या विषय समिती सभापती तसेच सदस्य आणि स्थायी समिती सदस्य पदाची निवडणूक बुधवारी बिनविरोध पार पडली

जालना : नगरपालिकेच्या विषय समिती सभापती तसेच सदस्य आणि स्थायी समिती सदस्य पदाची निवडणूक बुधवारी बिनविरोध पार पडली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे संख्याबळ अधिक असल्याने या निवडणुकीत शिवसेना - भाजपा युतीने उमेदवारी दाखल केली नाही.टाऊन हॉल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मंजुषा मुथा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. या निवडणुकीनुसार उपाध्यक्ष शाह आलमखान यांच्याकडे शिक्षण समिती सभापतीपद देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी सुमन संतोष माधोले, स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य सभापतीपदी रंजना अनंता शेळके, पाणीपुरवठा आणि जलनि:स्सारण सभापतीपदी संजय गुलाबचंद भगत, नियोजन व विकास सभापतीपदी संजय सोपान गायकवाड तर महिला व बालकल्याण सभापती म्हणून आशाताई प्रभूदास ठाकूर यांची निवड करण्यात आली. स्थायी समिती सदस्य म्हणून अनिता विष्णू वाघमारे, संजय मिठ्ठूलाल दाड, सत्यभामा विजय जाधव यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, उपाध्यक्ष शाह आलम यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)४भोकरदन - नगरपालिकेच्या पाच सभापतींची व स्थायी समितीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. स्थायी समितीमध्ये अध्यक्षा म्हणून नगराध्यक्षा रेखा चंद्रकांत पगारे यांची निवड करण्यात आली. ४विषय समित्यांचे सभापती म्हणून अनुक्रमे पाणीपुरवठा व जलनि:स्सारण सभापती म्हणून उपाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, सा.बां. सभापतीपदी शब्बीरखाँ पठाण, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य सभापतीपदी रेखा राजेंद्र दारूंटे, नियोजन व विकास सभापती म्हणून शफिकखाँ मेहताब खाँ पठाण तर महिला व बालकल्याण सभापती पदी कमलबाई दादाराव तळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ४विषय समित्यांच्या सभापतींचा स्थायी समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश आहे. याशिवाय प्रत्येक विषय समितीत चार सदस्यांची निवड करण्यात आली. सकाळी उपविभागीय अधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.