शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी- उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:33 IST

दुष्काळात शिवसेना शेतकºयांना वा-यावर सोडणार नाही. शेतक-यांच्या खांद्याला, खांदा लावून शेतक-यांना मदत करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी बदनापूर येथे आयोजीत शेतकरी मेळाव्यात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : दुष्काळात शिवसेना शेतकºयांना वा-यावर सोडणार नाही. शेतक-यांच्या खांद्याला, खांदा लावून शेतक-यांना मदत करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी बदनापूर येथे आयोजीत शेतकरी मेळाव्यात केले.येथील चाणक्य मंगल कार्यालयात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शेतक-यांना जनावरांसाठी पशुखाद्य वाटप करण्यात आले़यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, यापूर्वीच्या दुष्काळातही शेतक-यांना मदत व्हावी याकरीता आंदोलन करणारी शिवसेनाच होती. राज्याच्या ताकदीसमोर केंद्रशासनाला झुकावे लागले. शेतक-यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. शेतक-यांना माफी कशी करता त्यांना कर्जमुक्त करा, असा टोला ठाकरे यांनी केंद्र सरकारला लावला. मी आज राजकारण करायला आलो नाही. जनावरांना चारा नाही, पाण्यावाचून गुरे तडफडताहेत जनावरांना चारापाणी कोण देणार? राज्यात शेतक-यांना कर्जमाफी मिळेना, मात्र कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटण्यातच ३२ हजार कोटी कर्जमाफीचे गेले. मात्र याचा हिशोब सरकार देत नाही. प्रधानमंत्री पिकविमा, प्रधानमंत्री फळबाग अशा विविध योजना अंतर्गत शेतकºयांनी कोट्यवधी रुपये शासनाकडे भरले. मात्र शेतक-यांना तुटपुंजा विमा मंजूर करण्यात आला आहे. तर बहुतांश शेतक-यांना विमाच मिळाला नसल्याची खंत ठाकरे यांनी व्यक्त केली. याला केंद्र आणि राज्य शासन जबाबदार असल्याचे ठाकरे यांनी टोला लावला. यावेळी माजी आमदार संतोष सांबरे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना भगवी शाल देऊन स्वागत केले. यावेळी जि.प अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, जयप्रकाश चव्हाण, जि.प. सदस्य कैलास चव्हाण, गणेश डोळस, भगवान कदम, राजेंद्र ज-हाड राजेश जºहाड, गोरख लांबे, विलास पवार, भरत मदन, संजय बळप, अंबादास कोळसकर, मिर्झा शकूर बेग, नंदकिशोर दाभाडे, रवि बोचरे, श्रीराम कान्हेरे, अरूण डोळसे, राम पाटील आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.पंतप्रधान सोलापूरला आले मला अपेक्षा होती, ते दुष्काळासाठी काही मोठी घोषणा करून शेतक-यांना दिलासा देतील पण असे काही झाले नाही. यामुळे देशाचे पंतप्रधान शेतकºयांविषयी किती गंभीर आहेत, यावरुन दिसून येत असल्याची टीका उध्दव ठाकरे यांनी यावेळी केली. यामुळे तुम्ही शिवसेना पक्षाच्या पाठीमागे उभे राहा, तुमच्या ताकदीवरच जे करता येईल, ते शिवसेना करेल असे यावेळी ठाकरे म्हणाले.यावेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले.पशुखाद्य वाटपशिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते दुष्काळग्रस्त शेतक-यांना पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. मराठवाड्यातील दुष्काळात शेतक-यांच्या जनावरांसाठी १०० ट्रक पशुखाद्य वाटप करण्यासाठी आणले आहेत. दुष्काळग्रस्त शेतक-यांना पाऊस पडेपर्यंत जास्तीत जास्त मदत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे करणार असल्याचे वचन दिले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेdroughtदुष्काळFarmerशेतकरी