पाण्याच्या अंदाज न आल्याने पद्मावती धरणात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 19:46 IST2021-04-26T19:45:50+5:302021-04-26T19:46:21+5:30
पोहता येत नसल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाली.

पाण्याच्या अंदाज न आल्याने पद्मावती धरणात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
भोकरदन : तालुक्यातील पद्मावती धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान घडली. महेश शंकर काटोले ( २१ ) आणि अभिषेक प्रविण श्रीवास्तव ( १९ ) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारध येथील महेश शंकर काटोले आणि अभिषेक प्रविण श्रीवास्तव हे मित्रांसोबत दुपारी ३ वाजेच्या दरम्यान पद्मावती धरणात पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान, पोहता येत नसल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाली. दोघे बुडत असल्याने त्यांच्यासोबत असलेल्या रोहन काटोले ( १९) आणि अभिषेक तेलंगे (२० ) यांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून धरणालगतच्या शेतातील ग्रामस्थांनी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दोघांचा बुडून मृत्यू झाला होता. घटनेची माहिती पारध पोलिसांना देण्यात आली. सपोनि अभिजित मोरे, कर्मचारी प्रकाश शिंनकर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. पोलीस पुढील तपास करत आहेत.