घरासमोर उभी केलेली दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST2021-09-03T04:30:51+5:302021-09-03T04:30:51+5:30
अंबड येथून दुचाकी लंपास जालना : अंबड शहरातील प्रिन्स लॉज येथे उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची ...

घरासमोर उभी केलेली दुचाकी लंपास
अंबड येथून दुचाकी लंपास
जालना : अंबड शहरातील प्रिन्स लॉज येथे उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ३० ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी भगवान नारायण कटारे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लॅब फोडून साहित्य लंपास
जालना : भोकरदन तालुक्यातील वाढोणा येथील श्रीहरी असोसिएट प्रा. लि. कंपनीचे लॅब फोडून चोरट्यांनी दोन कॉम्प्युटर, एक युपीएस, एक माऊस, एचपी कंपनीचे प्रिन्टर लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी ज्ञानेश्वर रामदास चिकटे यांच्या फिर्यादीवरून पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास बी. एम. चौधरी हे करीत आहेत.
जुगार खेळणारे दोघे अटकेत
जालना : लोकांना जास्तीच्या पैशांचे आमिष दाखवून जुगार खेळणाऱ्या दोघांना सदर बाजार पोलिसांनी अटक केली. अमोल मुरलीधर भुतेकर (३२ रा. जालना), शिवलिंग वीर (रा. बरवार गल्ली) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी गणेश झलवार यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास मुसळे हे करीत आहेत.
जुगार खेळणारे सहा जण अटकेत
जालना : गोलाकार आकारात बसून जुगार खेळणाऱ्या सहा जणांना घनसावंगी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. या प्रकरणी त्रिंबक फुलसिंग राठोड यांच्या फिर्यादीवरून दिलीप रंगनाथ वराडे, अनिल रामा घोगरे, शंकर अण्णा घोगरे, बाबासाहेब पंडित वायकर, शुभम विठ्ठल घोगरे, पांडुरंग आबासाहेब घोगरे यांच्याविरुध्द घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.