दोन दुचाकींची समोरसमोर धडक; कोर्टाचे काम संपवून घरी परतणाऱ्या एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 19:13 IST2022-03-09T19:12:58+5:302022-03-09T19:13:09+5:30

या अपघातात इतर दोघे जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, त्यांची नावे समजू शकली नाही.

Two two-wheelers colliding head-on; Death of a person returning home after completing his court work | दोन दुचाकींची समोरसमोर धडक; कोर्टाचे काम संपवून घरी परतणाऱ्या एकाचा मृत्यू

दोन दुचाकींची समोरसमोर धडक; कोर्टाचे काम संपवून घरी परतणाऱ्या एकाचा मृत्यू

भोकरदन (जिल्हा जालना) : दोन दुचाकीच्या समोरा-समोर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी (ता.नऊ) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास भोकरदन सिल्लोड मुख्य रस्त्यावरील मुठाड पाटीजवळ घडली.

भिमराव रामा राऊत (60) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिल्लोड तालुक्यातील बाळापूर येथील भिमराव राऊत हे न्यायालयाच्या कामानिमित्त भोकरदन येथे आले होते. काम आटोपल्यानंतर दुपारी ते दुचाकीने गावाकडे जात असतांना भोकरदन सिल्लोड मुख्य रस्त्यावरील मुठाड पाटीजवळ सिल्लोडकडून येणारी दुचाकी त्यांच्या दुचाकीला धडकली. 

या अपघातात भिमराव राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात इतर दोघे जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, त्यांची नावे समजू शकली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अपघाताचा पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत आहे.

Web Title: Two two-wheelers colliding head-on; Death of a person returning home after completing his court work