अ‌वैधरित्या वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:21 IST2021-06-03T04:21:53+5:302021-06-03T04:21:53+5:30

शहागड : अंबड तालुक्यातील डोमलगाव गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर गोंदी पोलिसांनी जप्त केले. पोलिसांनी ...

Two tractors transporting sand illegally seized | अ‌वैधरित्या वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

अ‌वैधरित्या वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

शहागड : अंबड तालुक्यातील डोमलगाव गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर गोंदी पोलिसांनी जप्त केले. पोलिसांनी वाळूसह १२ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास करण्यात आली.

डोमलगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती गोंदी पोलिसांना मिळाली. या माहितीवरून सदर ठिकाणी पोलीस गेले असता, चालक ट्रॅक्टर सोडून पळून गेले. दोन्ही ट्रॅक्टर वाळूने भरलेले असून, पोलिसांनी सदर ट्रॅक्टर जप्त केले आहेत. पोलिसांनी १२ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शहागड पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई गोंदी ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, शहागड चौकीचे पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे, हे.कॉ. उदय पाटोळे, महेश तोटे, चालक गणेश मुंडे, होमगार्ड राठोड, कणके यांनी केली.

Web Title: Two tractors transporting sand illegally seized