दोन ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:24 IST2019-03-30T00:24:12+5:302019-03-30T00:24:28+5:30

अंबड तालुक्यातील पाथरवाला बु. येथून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे दोन विना क्रमांकाचे ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने शुक्रवारी सकाळी पकडले आहेत.

Two tractors seized | दोन ट्रॅक्टर पकडले

दोन ट्रॅक्टर पकडले

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदी/शहागड : अंबड तालुक्यातील पाथरवाला बु. येथून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे दोन विना क्रमांकाचे ट्रॅक्टर महसूलच्या पथकाने शुक्रवारी सकाळी पकडले आहेत.
शहागड ते गंगाचिंचोली या गोदावरीच्या पट्ट्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा गेल्या काही महिन्यांपासून सर्रास सुरू होता. याकडे मात्र, पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत होते. परंतु, नव्याने अंबड तहसील कार्यालयाचा पदभार स्वीकारलेल्या तहसीलदार मेने यांनी वाळू तस्करांवर कारवाईचा भडिमार सुरू केला आहे. यासाठी त्यांनी महसूल विभागाचे एक पथक देखील तयार केले आहे.
यात मंडळ अधिकारी डी. जी. कुरेवाड, तलाठी व कोतवाल आदींचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी या पथकाने पाथरवाला ते महाकाळा या रस्त्यावर वाळूची वाहतूक करणारे दोन विना क्रमांक ट्रॅक्टर पकडले.

Web Title: Two tractors seized