शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ट्रेलर-कंटेनर अपघातात दोनजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:16 AM

ट्रेलर आणि कंटेनरच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोनजण ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना जालना - औरंगाबाद महामार्गावरील गेवराई बाजार फाट्याजवळ रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देबदनापूर : गेवराई बाजार फाट्याजवळ पुन्हा एक मोठा अपघात घडल्याने चिंता

बदनापूर : ट्रेलर आणि कंटेनरच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोनजण ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना जालना - औरंगाबाद महामार्गावरील गेवराई बाजार फाट्याजवळ रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. विठ्ठल रंगनाथ बरबडे (२७. रा. पाचेगाव ता. गेवराई. जि. बीड), अमन अजीज (रा. भिलाई. छत्तीसगड) असे मयतांची नावे आहेत.जालन्याकडून औरंगाबादकडे जाणारा कंटेनर (क्रं. एमएच. ४३. वाय. ७१३०) दुभाजकावर चढला. याचवेळी औरंगाबादकडून जालन्याकडे येणाऱ्या ट्रेलरने े(क्रं.सीजी.०७.बिके.७४११) धडक दिली. हा अपघातजालना - औरंगाबाद मार्गावरील गेवराई बाजार फाट्याजवळ घडला. या अपघातात कंटेनर चालक विठ्ठल बरबडे हे जागीच ठार झाले तर अमन अजीज यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून, त्यांचे नाव समजू शकले नाही. या धडकेत दोन्ही वाहनांचा चुराडा झाला आहे.दरम्यान, अपघातामुळे मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. या अपघातानंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अनेजणांनी या अपघाताचे फोटो मोबाईल मध्ये कैद केले.तीन दिवसात दुसरा अपघातजालना - औरंगाबाद महामार्गवर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. वाहनांची वाढती संख्या, वाहनांचा अतिवेग यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. तीन दिवसांपूर्वीच या मार्गावरील शेकट्या जवळ कारने रिक्षाला धडक दिली होती.त्यात पाचजण ठार झाले.

टॅग्स :JalanaजालनाAccidentअपघातDeathमृत्यू