शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भोकरदन-जालना रस्त्यावर दुचाकी-ट्रकचा अपघात, दोघे जागीच ठार, तर अन्य एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 19:41 IST

रस्त्यावर रक्ताचा सडा!

केदारखेडा : ओव्हरटेकच्या नादात दुचाकी व ट्रकमध्ये समोरासमोर जोराची धडक झाली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर, तिसरा गंभीर जखमी आहे. हा भीषण अपघात रविवारी दुपारी ४:३० वाजता भोकरदन ते जालना रोडवरील प्रकाश गड हॉटेलसमोर झाला. दुचाकीवरील सुरज संजय राऊत (वय १७) व आयुष सतीश पवार (वय १५) अशी जागीच ठार झालेल्याची नावे आहे. तर अभय बारवकर (तिघेही रा. राजुर) असे गंभीर जखमीचे नाव असून, त्याला उपचारासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भोकरदनवरून राजूरकडे दुचाकी (एमएच-२८-एयू-६६१८) वरून येत असताना समोरील वाहनाला दुचाकीस्वाराने ओव्हरटेक करताना समोरून जालन्याकडून भोकरदनकडे जाणाऱ्या ट्रक (एमएच-२१-एक्स-६२९९) ची समोरासमोर जोराची धडक झाली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला आहे. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्ताचा सडा पडला होता. 

दरम्यान, परिसरातील शेतकऱ्यांनी तत्काळ पोलिसांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे, पोलिस कॉन्सटेबल शिवाजी जाधव, हसनाबाद पोलिस ठाण्याचे राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला केदारखेडा आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकेमार्फत भोकरदन ग्रामीण रुग्णालयात हलविले. तर अपघातील दोघांना राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, दोघांचाही मृत्यू झाला आहे.

सोमवारी सकाळी श्वविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती राजूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कावळे, मेडिकल ऑफिसर डॉ. राजू राठोड यांनी दिली. या अपघातील ट्रकमालक फिरोज खान (रा. जालना), तर चालक विलास अर्दाड (रा. बीड) असून, अपघातील दुचाकी नितीन खेत्रे (रा. देऊळगाव, ता. मेहकर) यांच्या मालकीची असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhokardan-Jalna Road Accident: Two Killed, One Injured in Crash

Web Summary : Two young men died and another was seriously injured in a collision between a motorcycle and a truck near Bhokardan. The accident occurred while overtaking; police are investigating.
टॅग्स :Accidentअपघात