चार तलवारींसह दोघे जेरबंद; जालना एलसीबीची कारवाई
By दिपक ढोले | Updated: August 8, 2023 19:02 IST2023-08-08T19:02:31+5:302023-08-08T19:02:40+5:30
या प्रकरणी सदर बाजार व चंदनझिरा ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चार तलवारींसह दोघे जेरबंद; जालना एलसीबीची कारवाई
जालना : अवैधरीत्या तलवारी बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ताब्यात घेतले. शेख अफजल शेख अहमद नबाब (रा. शकुंतलानगर, जालना) व भरत लल्लू फुलवाडे (१९, रा. कन्हैयानगर, जालना) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून चार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री विशेष मोहीम राबविली. या अंतर्गत संशयित शेख अफजल शेख अहमद नबाब याला शकुंतलानगर येथून ताब्यात घेऊन एक तलवार तर भरत फुलवाडे याला कन्हैयानगर येथून ताब्यात घेऊन तीन तलवारी जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी सदर बाजार व चंदनझिरा ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सपोनि. आशिष खांडेकर, पोउपनि. प्रमोद बोंडले, पोउपनि. राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, गोपाल गोशिक, विजय डिक्कर, प्रशांत लोखंडे, सचिन चौधरी, सागर बावीस्कर, लक्ष्मीकांत आडेप, सतीश श्रीवास, कैलास चेके, योगेश सहाणे, रमेश पैठणे, सौरभ मुळे यांनी केली.