दोन हायवा आणि दोन ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:22 AM2019-03-21T00:22:13+5:302019-03-21T00:22:39+5:30

गोदावरी नदीपात्रातून अवैधपणे उत्खनन करुन चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन हायवा आणि दोन ट्रॅक्टर गोंदी पोलिसांनी बुधवारी पहाटे सापळा लावून पकडले.

Two highways and two tractors were found | दोन हायवा आणि दोन ट्रॅक्टर पकडले

दोन हायवा आणि दोन ट्रॅक्टर पकडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : अंबड तालुक्यातील गोरी-गंधारी, डोमलगाव परिसरातून गोदावरी नदीपात्रातून अवैधपणे उत्खनन करुन चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन हायवा आणि दोन ट्रॅक्टर गोंदी पोलिसांनी बुधवारी पहाटे सापळा लावून पकडले.
एपीआय शिवानंद देवकर, उपनिरीक्षक हनुमंत वारे, सहायक फौजदार सय्यद नासिर, पो.कॉ. महेश तोटे, गणेश बुजाडे, गणेश लक्कस आदींच्या पोलीस पथकाने बुधवारी पहाटे साडेचारच्या दरम्यान पैठण फाट्यावर पाळत ठेवली असता, पाच-पाच ब्रास अवैध वाळूने भरलेले हायवा क्र. एम.एच.२१.बी.एच.०६०० एम.एच.२१ ए.वाय.५५९६ मिळून आले. तर कुरण-पाथरवाला रस्त्यावर अवैध वाळू तस्करी करणारे दोन ट्रॅक्टर आढळून आले.
पो.कॉ. गणेश लक्कस यांच्या फिर्यादीवरून हायवा चालक सलीम इसाक शहा (रा. औरंगाबाद), संतोष विठ्ठल मुळे (रा. अंबड), ट्रॅक्टर चालक विजय भगवान सातपुते, दिगंबर शाहूराव थोरात (रा. दोन्ही कुरण ता.अंबड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहने जप्त करून शहागड पोलीस चौकीत लावण्यात आली आहेत.
अवैध वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
तीर्थपुरी : गोदावरी पात्रातून चोरी वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर तहसीलदार चंद्रकात शेळके यांच्या पथकाने बुधवारी सकाळी पकडल्याने वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
रामसगाव येथून गोदावरी पात्रातून अवैधपणे वाळूची चोरी करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार चंद्रकात शेळके यांच्या पथकाला मिळाली होती. यामुळे मंडळ अधिकारी एस. टी. साळवे, तलाठी आर. वाय. शेख, एन. व्ही. सोनवणे, बी. व्ही. चौरे यांनी रामसगाव परिसरात सापळा लावून वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर एक मोटार सायकल जप्त करुन तीर्थपुरी येथील पोलीस चौकीत जमा केले. धर्मराज उढाण, आदित्य भालेकर यांच्या मालकीचे ट्रॅक्टर असल्याचे सांगण्यात येत आहे. चालक आणि मालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु रात्री होती. जोगलादेवी परिसरातूनही मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी होत आहे. रात्रीच्या वेळी अनेक हायवाव्दारे वाळूची चोरटी वाहतूक करण्यात येत आहे.

Web Title: Two highways and two tractors were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.