लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील विरेगाव व बोरगावजहागीर येथे पिसाळलेल्या कुत्र्यानी दोन बालकांना चावा घेऊन गंभीर जखमी केले. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. जखमींंवर औरंगाबाद शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.येथील सय्यद हसनैन सय्यद शाकेर (४) हा बोरगाव जहागीर येथे गेला होता. घराजवळ खेळत असताना एका कुत्र्याने त्याला अचानक चावा घेवून जखमी केले.विरेगाव येथे दुपारी एकच्या सुमारास अंगणात खेळत असलेल्या अश्विनी गजानन पिसे (४) हिला कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. रहिवाशांनी तिची सुटका केली. प्रथमोपचार केल्यानंतर जखमी दोघींना औरंगाबादला घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.
कुत्र्याच्या हल्ल्यात दोन बालके गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:49 IST