शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

स्ट्राँग रूममधील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 01:15 IST

जुना जालना भागातील गांधी चमन परिसरात असलेल्या एसबीआय बँकेच्या स्ट्राँग रूमपर्यंत जाऊन तिजोरी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जुना जालना भागातील गांधी चमन परिसरात असलेल्या एसबीआय बँकेच्या स्ट्राँग रूमपर्यंत जाऊन तिजोरी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील जुना जालना भागात भारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाची (एसबीआय) शाखा आहे. शाखेचे लेखापाल मोहित अश्विनकुमार व त्यांचे सहकारी १२ जून रोजी रात्री ७.३० वाजता कामकाज संपल्यानंतर घरी गेले होते. त्यानंतर सलग दोन दिवस बँकेला सुट्या होत्या. सोमवारी सकाळी बँकेचे मॅनेजर संदीप राजदेव, सुरक्षा रक्षक भांबरे हे बँकेत आले असता चॅनल गेटचे व बँकेच्या शटरचे कुलूप तुटल्याचे दिसून आले. त्यानंतर घटनास्थळी आलेले लेखापाल व इतरांनी बँकेत जाऊन पाहणी केली असता चोरट्याने आतील स्ट्राँग रूमपर्यंत जाऊन तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.बँकेच्या शटरचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केलेल्या चोरट्याच्या हलचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. पोलिसांनी चोरट्याच्या हालचालींची पाहणी केली असून, त्याच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत.

टॅग्स :bankबँकRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी