शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

मुसळधार पावसाने झोडपले; वाहतूक ठप्प, शेतकऱ्यांपुढे ओल्या दुष्काळाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 17:29 IST

rain in Jalana : कपाशी , सोयाबीन , तूर ,बाजरी या पिकांसह मोसंबी आणि डाळिंब अशी फळपिकेही धोक्यात आली आहेत.

ठळक मुद्देगोंदी, वडीगोद्री, सुखापुरी शिवाराला पावसाने झोडपलेअंबड तालुक्यातील पाच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे 

अंबड ( जालना ) :  तालुक्यातील  गोंदी , वडीगोद्री , सुखापुरी मंडळात सोमवारी पावसाने पुन्हा झोडपून काढले. तालुक्यातील अनेक  गावांत पिके पाण्यात गेली आहेत. गोदावरी व इतर नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी संपर्क  तुटलेला आहे.

तालुक्यात मागील आठवडाभरापासून पाऊस  ठाण मांडून आहे. दरम्यान, सोमवारी व मंगळवारी पहाटेच   शिवारात जोरदार पाऊस झाला. सततच्या पावसाने शेतात खरीप पिके  पाण्यात गेली आहेत. तालुक्यात  गोदावरी नदी, गल्हाटी नदीला पूर आला आहे. मंगला , लेंडी नदी, चांदसुरा नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. वडीगोद्री मंडळात 133 मिमी तर गोंदी मंडळात 160 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गल्‍हाटी नदीला पूर आल्‍याने आधीच्या पूर परिस्थितीने त्रस्त झालेल्या पिठोरी सिरसगाव, घुंगर्डे हादगाव येथील ग्रामस्थांचे पुन्हा पूर  स्थितीमुळे जीवन विस्कळीत झाले आहे. महसूल प्रशासनाने  तातडीने पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.  महागडी बियाणे, खते व औषधींचा खर्च करून पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे ओल्या दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. कपाशी , सोयाबीन , तूर ,बाजरी या पिकांसह मोसंबी आणि डाळिंब अशी फळपिकेही धोक्यात आली आहेत.

Flood : मांजरा नदी काठावर अडकलेल्या २५ जणांची सुटका; बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरला पाचारण

जायकवाडी धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्याने पिण्याच्या आणि आरक्षित पाण्याचा वर्षभराचा प्रश्न मिटला आहे. नदी-नाले ओसांडून भरले असून अनेक गावांना धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. जोरदार पावसाने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत  मोठी वाढ झाली आहे. एकूणच अतिपावसाने पिके पिवळी पडून करपत आहेत. - जोरदार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने या भागात वस्तुनिष्ठ पीक पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी. अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

गुलाब चक्रीवादळाचा फटका, औरंगाबादेत अनेक भागांतील घरांत घुसले पाणी, झाडे उन्मळून पडली

दि. 28 सप्टेंबर रोजी  सकाळी आठ वाजेपर्यंत अंबड तालुक्यातील सात महसुल मंडळात खालीलप्रमाणे पाऊस (मी.मी.) पडला आहे.गोंदी 160,वडीगोद्री -133 ,रोहिलागड -  45 ,,सुखापुरी 164 , धनगर पिंप्री 90 , अंबड - 77 ,जामखेड - 40  मिमी पावसाची नोंद झाली.बहुतांश भागांमध्ये सध्या पाऊस कोसळत आहे. 

टॅग्स :RainपाऊसJalanaजालनाagricultureशेती