आज जालना-वडीगोद्री रस्ता कामाचे भूमिपूजन : नारायण कुचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 01:03 IST2018-10-02T01:02:27+5:302018-10-02T01:03:06+5:30

जालना ते वडीगोद्री या मार्गाच्या रूंदीकरणाच्या कामाचे भुमिपूजन मंगळवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

Today's Jalpa-Vadigodi road works Bhumi Pujan | आज जालना-वडीगोद्री रस्ता कामाचे भूमिपूजन : नारायण कुचे

आज जालना-वडीगोद्री रस्ता कामाचे भूमिपूजन : नारायण कुचे

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : जालना ते वडीगोद्री या मार्गाच्या रूंदीकरणाच्या कामाचे भुमिपूजन मंगळवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. यासाठी ३३७ कोटी रूपयांचा निधी मंजूर असल्याची माहिती आ.नारायण कुचे यांनी दिली आहे.
या मार्गासह पाचोड- आष्टी या कामाचेही भूमिपुजन करण्यात येणार असल्याची कुचे यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे राहणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री बबनराव लोणीकर, दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे, आ. संतोष दानवे, माजी आ.विलास खरात, माजी आ. अरविंद चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, उपसभापती भास्कर दानवे, भाजपा ता. अध्यक्ष अवधुत खडके, जिल्हाउपाध्यक्ष दिपक ठाकूर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता कुचे यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपाचे शेखर मोहरीर, दीपक ठाकूर, गंगाधर वराडे, बाळू खरात, राम लांडे, प्रसाद झाडे, बबन बुदिलखंडे, फेरोज शेख, लाल खॉ पठाण यांनी केले आहे.

Web Title: Today's Jalpa-Vadigodi road works Bhumi Pujan