आज सखी मंच सदस्यांसाठी ‘एकापेक्षा एक अप्सरा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:01 IST2018-02-01T00:01:12+5:302018-02-01T00:01:34+5:30
शहरातील सखी मंच सदस्यांसाठी ‘एकापेक्षा एक अप्सरा ’ या लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील मातोश्री लॉन्सवर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता हा बहारदार कार्यक्रम होणार आहे.

आज सखी मंच सदस्यांसाठी ‘एकापेक्षा एक अप्सरा’
जालना : शहरातील सखी मंच सदस्यांसाठी ‘एकापेक्षा एक अप्सरा ’ या लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील मातोश्री लॉन्सवर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता हा बहारदार कार्यक्रम होणार आहे.
सखी मंच सदस्य नोंदणीस ३१ जानेवारीपासून प्रारंभ झाला. लोकमत सखी मंच सदस्य होण्यासाठी महिलांची प्रथम पसंती असते. दर वर्षी जुन्या सदस्यांबरोबर नवीन शेकडो महिला या मंचच्या भाग होण्यासाठी इच्छुक असतात. हे लक्षात घेता वर्षभरात लोकमत सखी मंच सदस्यांसाठी एकापेक्षा एक सरस मनोरंजनात्मक कार्यक्रम, भरपूर बक्षिसे जिंकण्याची संधी लोकमतने उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक सखी मंच सदस्याला अंजली कीचन जंबो सेट, जागर स्त्री शक्तीचा हे विशेष महिलांशी संबंधित बुक, सखी मंच ओळखपत्र, तसेच पाच हमखास वस्तू कूपन भेट मिळणार आहे. त्याचबरोबर गोल्डन धमाकामध्ये राज्यस्तरावर एक लाख ५१ हजारांपासून ११ हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची पाच हमखास बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर वर्षभर विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सखी मंच सदस्यांना देण्यात येणार आहे. सखी मंच सदस्य नोंदणीच्या अधिक माहितीसाठी लोकमत कार्यालय, गीता कॉप्लेक्स, भोकरदन येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.