तीन नगराध्यक्ष बिनविरोध विराजमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:57 IST2018-05-24T00:57:21+5:302018-05-24T00:57:21+5:30

जाफराबाद, घनसावंगी, मंठा आणि बदनापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक झाली.

Three municipal elections unanimously | तीन नगराध्यक्ष बिनविरोध विराजमान

तीन नगराध्यक्ष बिनविरोध विराजमान

जालना : जिल्ह्यातल्या जाफराबाद, घनसावंगी, मंठा आणि बदनापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक झाली. यामध्ये जाफराबादच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कविता वाकडे, मंठा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे नितीन राठोड आणि घनसावंगीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राजक्ता देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. तर बदनापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत संख्याबळ कमी असतानाही भाजपाचे प्रदीप साबळे दहा मते मिळवून विजयी झाले. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार प्रिती साबळे यांचा तीन मतांनी पराभव केला.

Web Title: Three municipal elections unanimously