शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
3
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
4
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
6
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
7
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
8
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
9
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
10
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
11
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
12
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
13
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
14
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
15
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
16
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
17
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
18
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
19
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
20
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?

तीन तासांचा थरार अन् बिबट्या विहिरीच्या बाहेर; वनविभागाच्या पथकाची मेहनत कामी आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 19:34 IST

वाढोणा शिवारातील घटना : प्रारंभी बाज आतमध्ये सोडून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्या प्रयत्नामध्ये बिबट्या विहिरीच्या बाहेर येऊ शकला नाही.

जालना : विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. तीन तासांच्या थरारक कसरतीनंतर झाडाच्या फांद्यावर चढून तो बिबट्या विहिरीबाहेर पडला. ही घटना शुक्रवारी वाढोणा (ता.भोकरदन) शिवारात घडली.

वाढोणा शिवारातील एका विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती शुक्रवारी सहायक वनसंरक्षक पुष्पा पवार यांना मिळाली होती. घटनेची माहिती मिळताच पवार यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एन. खलसे, वनपाल ए.ए. राठोड, मांटे, पचलोरे, बुरकुले यांच्यासह सर्व वनरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच औरंगाबादेतील वनविभागाची शीघ्रकृती दलाची टीमही घटनास्थळी धावली. विहीर उथळ आणि पंधरा फूट खोल होती. शिवाय विहिरीतून बिबट्याला बाहेर काढण्यासाठी पिंजरा टाकणेही अवघड होते. यामुळे बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या पथकाला मोठी कसरत करावी लागली. विशेषत: प्रारंभी बाज आतमध्ये सोडून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्या प्रयत्नामध्ये बिबट्या विहिरीच्या बाहेर येऊ शकला नाही. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी विहिरीच्या शेजारी असलेले झाड तोडून विहिरीमध्ये आडवे केले. झाड विहिरीमध्ये आडवे करताच तो बिबट्या झाडाच्या फांद्यांवर चढून विहिरीबाहेर आला. विहिरीबाहेर आलेला बिबट्या हा वनक्षेत्राकडे धावून गेला. यावेळी वाढोणा व परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांची उपस्थिती होती.

पाण्यासाठी भटकंतीसध्या उन्हाचे चटके वाढले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू असल्याचे दिसून येते. हा बिबट्या पाण्याच्या शोधार्थ येऊन विहिरीत पडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. वाढोणा शिवारासह अजिंठाच्या डोंगररांगांमधून हा बिबट्या वाढोणा शिवारात आल्याचा अंदाजही वर्तविला जात आहे.

महिनाभरातील दुसरी घटनामहिनाभरापूर्वीच जाफराबाद तालुक्यातील काळेगाव शिवारातील विहिरीत एक बिबट्या पडला होता. या बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी वनविभागाच्या पथकाला कसरत करावी लागली. त्यानंतर आता वाढोणा शिवारात हा बिबट्या विहिरीत पडल्याचे दिसून आले. वन्य प्राण्यांची भटकंती थांबविण्यासाठी वनक्षेत्रात पाण्याची मुबलक उपलब्धता करणे गरजेचे आहे.

टॅग्स :forestजंगलleopardबिबट्याJalanaजालना