साडेतीन लाखांचा औषधीसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:48 IST2019-11-21T00:48:28+5:302019-11-21T00:48:47+5:30
अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील मिर्झा क्लिनकवर मंगळवारी धाड टाकली

साडेतीन लाखांचा औषधीसाठा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
केदारखेडा : अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील मिर्झा क्लिनकवर मंगळवारी धाड टाकली होती. त्यानंतर बुधवारी केलेल्या तपासणीत औषध खरेदी, विक्री, साठवणूक करण्यासाठी आवश्यक असलेला परवाना न घेता अवैधरीत्या ३ लाख ४६ हजार रूपये किमतीच्या औषधांचा साठा केल्याचे आढळून आले.
भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील साहेबबेग मिर्झा यांच्या मालकीच्या मिर्झा क्लिनिकमध्ये अवैध औषधांचा साठा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीवरून औषध प्रशासनाचे सह आयुक्त मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक अंजली मिटकर, आर.डी. कुलकर्णी, पा. वा. नाडे यांच्या पथकाने मंगळवारी मिर्झा क्लिनिकवर धाड मारली. यावेळी केलेल्या तपासणीत ३ लाख ४६ हजार रूपये किमतीचा अवैध औषध साठा आढळून आला.
अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने औषध विक्रेत्यांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. मात्र, या सूचनांकडे अनेकांचे दुर्लक्ष होत असल्याचे या कारवाईतून समोर येत आहे.